• Sat. Jun 6th, 2026
    प्रेमविवाह झाला, लग्नाच्या खर्चावरुन वाद, सून आईसोबत आली, ठोश्याने सासूबाईंचा दात पाडला, मुलावर गंभीर आरोप

    Chhatrapati Sambhajinagar News : मंदा सुरडकर व त्यांचा मुलगा करण खाली आले असता तिघींनी लग्नातील खर्चाच्या कारणावरून वाद घालत शिवीगाळ केली व हाताचापटांनी मारहाण केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : लग्नात झालेल्या खर्चाच्या कारणावरून सुनेसह तिच्या आईने सासु-सासरा आणि पतीला शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तसेच सासूच्या तोंडावर ठोसा मारून त्यांचा एक दात पाडला. ही घटना १७ मार्च रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास ब्रिजवाडी परिसरात घडली. कोमल करण सुरडकर (वय २२), उमा मिलिंद घोरपडे (वय ४०) आणि पायल जावळे (वय २५, सर्व रा. ब्रीजवाडी, एमआयडीसी चिकलठाणा) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत.

    काय आहे प्रकरण?

    प्रकरणात मंदा परमेश्वर सुरडकर (वय ३८, रा. ब्रिजवाडी, एमआयडीसी चिकलठाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंदा सुरडकर यांना दोन मुलं असून एका मुलाचे लग्न झालं आहे. तो पत्नीसह वेगळे रहातो, तर मंदा सुरडकर या पती व त्यांच्या दुसऱ्या मुलासह राहतात. सुनेच्या प्रसुतीनंतर मुलगा अधूनमधून घरी येत होता.
    Maharashtra TimesPune Friends Death : लेह-लडाखहून परत येताना काळाचा घाला, पुण्यातील तीन मित्रांचा अपघाती अंत, विमानाने परतलेला दोस्त धक्क्यात

    सासूबाईंचा दात पाडला

    दरम्यान, १७ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मंदा सुरडकर या पती व लहान मुलासोबत घरी होत्या. त्यावेळी सून कोमल सुरडकर हिच्यासह तिची आई उमा घोरपडे व बहीण पायल जावळे या तिघी सुरडकर यांच्या घरी आल्या. घरासमोर उभे राहून त्यांनी शिवीगाळ सुरू केली. खाली येण्यास सांगितल्यानंतर मंदा सुरडकर व त्यांचा मुलगा करण खाली आले असता तिघींनी लग्नातील खर्चाच्या कारणावरून वाद घालत शिवीगाळ केली व हाताचापटांनी मारहाण केली.

    सुट्टीत फिरायचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील १० बजेटफ्रेंडली ठिकाणांची यादी

    अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी

    या मारहाणीत सून कोमल हिने सासू मंदा सुरडकर यांच्या तोंडावर जोरात ठोसा मारल्याने त्यांचा समोरील दात पडला. गोंधळ ऐकून पती परमेश्वर सुरडकर यांनी त्यांची भांडण सोडविली. दरम्यान हाणामारीनंतर सून कोमल हिने तुमच्या मुलावर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करून तुम्हाला गुन्ह्यात अडकवणार असे म्हणत धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या सुनेसह वरिल तिघी हे सुरडकर कुटुंबाला वारंवार त्रास देतात.
    Maharashtra TimesPune Crime : पुण्यातील 12 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचं गूढ उकललं, समलिंगी संबंधाला विरोधातून नात्यातील तरुणाने संपवलं, 22 वर्षीय आरोपी अटकेत
    मंदा सुरडकर यांचा मुलगा व सुनेचा प्रेम विवाह असून लग्नामध्ये झाले खर्चाच्या कारणावरून वांरवार पैशांची मागणी केली जात आहे. अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. या प्रकरणी मंदा सुरडकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा