Nashik Bribe Case: नाशिक जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे यांना ACBने ५० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, एका कामाच्या बदल्यात वैशाली ठाकरे यांनी संबंधित ठेकेदाराकडे पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने ठेकेदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि रीतसर तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची गांभीर्याने दखल घेत बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास सापळा रचला. ठेकेदार लाचेची रक्कम घेऊन कार्यालयात पोहोचला, तेव्हा दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने ठाकरे यांना पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
Nashik News: दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात नको त्या वस्तू! साडी, हिरवा चुडा, गर्भनिरोधकांची पाकिटे अन् बरेच काही…
या कारवाईनंतर त्यांना तातडीने ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
वैशाली ठाकरे यांच्याबद्दल यापूर्वीही ठेकेदारांमध्ये कमालीचा असंतोष होता. कामाच्या निमित्ताने भेटायला येणाऱ्या ठेकेदारांशी अत्यंत उद्धटपणे वागणे आणि अर्वाच्च्य भाषेचा वापर करणे, अशा तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. या कारवाईमुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नाशिकला गारपिटीचा तडाखा! काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची भीती, बळीराजा संकटात
तर दुसऱ्या एका घटनेत, महाविद्यालयीन निवडणुकीच्या बॅनरवर फोटो सर्वांत खाली लावल्याच्या क्षुल्लक कारणावरून एकाने गुन्हेगारांच्या मदतीने विद्यार्थ्याचे अपहरण केल्याची घटना उघड झाली आहे. पदवीधर विद्यार्थ्यासह त्याच्या मित्रांना रात्रभर डांबून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत दहा हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आली. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी सराईत गुन्हेगार संशयित गौरव घुगे याच्यासह साथीदारांवर गुन्हा नोंदवला आहे.
