• Fri. Sep 11th, 2026

Mumbai Sewri workshop Accident : १७ वर्षीय कामगार चालवत असलेली गाडी अचानक पुढे सरकली आणि जवळच बसलेला त्याचा ३२ वर्षीय सहकाऱ्यावर धडकली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिवडी येथील एका ऑटोमोबाईल वर्कशॉपमध्ये बुधवारी एसयूव्ही कारखाली चिरडून एका ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय कामगार चालवत असलेली गाडी अचानक पुढे सरकली आणि त्या कामगाराला धडकली. मयत कामगाराचे नाव साजिद अली शेख आहे. ‘कोलगेट जेटी’ येथील ऑटोमोबाईल वर्कशॉपमधील वॉशिंग एरियातील भिंतीजवळ तो बसला असताना सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ‘XUV700’ गाडी पुढे सरकली. यात साजिदला गंभीर दुखापत झाली होती. त्याला केईएम रुग्णालयात नेण्यात आले असता तिथे मृत घोषित करण्यात आले.

कंत्राटदारावर गुन्हा, अल्पवयीन मुलगा ताब्यात

या घटनेमुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे, तो म्हणजे १७ वर्षांच्या मुलाला वर्कशॉपमध्ये कामावर कसे घेतले गेले आणि तो गाडी चालवण्याचे काम कसे करत होता? पोलिसांनी कंत्राटदार मोहम्मद गुड्डू खान याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. एफआयआरमध्ये सर्व्हिस कर्मचारी मनोज वसंत शिवरीकर (वय ५६) आणि वॉशिंग-साइट सुपरवायझर जफर शेख यांचीही नावे आहेत. पोलिसांनी ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १०६(१) आणि ‘बाल व किशोर कामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा’ चे कलम १४ लागू केले आहे.

गुड्डू खान याच्याकडे महिंद्राच्या गाड्या धुण्याचे कंत्राट होते, मनोज हा सर्व्हिस कर्मचारी होता आणि जफर शेख हा वॉशिंग-साइट सुपरवायझर होता. एसयूव्ही चालवणाऱ्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.” वडाळा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याच्या टप्प्यावर ही घटना त्या अल्पवयीन मुलावर स्वतंत्र फौजदारी खटला चालवण्यासारखी वाटत नाही.

Maharashtra TimesKanpur Murder : स्मार्ट दिसतोस रे.. लग्न नाही का केलं अजून? जुन्या नोकराला लाडीगोडी, घोळात घेऊन प्लॅन आखला, शालूची ‘धोखेबाजी’ उघड

साजिदला १३-१४ वर्षांचा अनुभव

शिवडीचे रहिवासी आणि साजिदचे दूरचे नातेवाईक शेख मोहम्मद अमीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद ‘3M’ कंपनीमार्फत वाहने धुण्याचे आणि आतील भाग स्वच्छ करण्याचे काम गेल्या १३-१४ वर्षांपासून करत होता. त्याला ‘महिंद्रा अँड महिंद्रा’च्या केंद्रावर कामासाठी नेमण्यात आले होते. तो महिन्याला सुमारे १६ ते १८ हजार रुपये कमवत असे, असे अमीर यांनी सांगितले.

कुटुंबाच्या वकिलांचे म्हणणे

“यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकावर कारवाई जाली पाहिजे आणि त्यांनी कुटुंबाला नुकसानभरपाई दिली पाहिजे. तिथे एक अल्पवयीन मुलगा काम करत होता आणि त्याला वाहन हाताळण्याची मुभा देण्यात आली होती. यात सहभागी असलेल्या सर्वांच्या जबाबदारीची तपासणी होणे गरजेचे आहे” असे कुरेशी म्हणाले. कामगारांच्या नेमणुकीत सहभागी असलेल्या कंपन्यांच्या जबाबदारीबाबतही कुटुंबाने प्रश्न उपस्थित केले आहेत.

Maharashtra TimesNashik News : समृद्धी महामार्गावरील अपघातात 21 वर्षांचा तेजस ब्रेन डेड, अनावर दुःखातही गायकवाडांचा मोठा निर्णय, मुंबईपर्यंत एअर ग्रीन कॉरिडोर

कुटुंबाला शोक अनावर

“त्याचे लग्न होऊन साधारण दोन-तीन वर्षे झाली होती आणि त्याला व त्याच्या पत्नीला मूल होण्याची आशा होती. साजिद हा कुटुंबाचा मुख्य कमावता सदस्य होता आणि तो आपल्या पत्नीचा व वृद्ध पालकांचा सांभाळ करत होता.” असे अमीर यांनी सांगितले. साजिद अत्यंत गरीब कुटुंबातील होता आणि फुटपाथवरील घरात राहत होता. कुटुंबाला नुकसानभरपाई मिळायला हवी, असे ते म्हणाले. “साजिद हा मुख्य कमावता सदस्य होता. त्याची पत्नी आणि वृद्ध आई-वडील त्याच्यावर अवलंबून होते. तो अत्यंत गरीब कुटुंबातून आला होता आणि फुटपाथवरील घरात राहत होता. कुटुंबाला नुकसानभरपाई दिली पाहिजे” असे अमीर म्हणाले.

साजिदच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, वॉशिंगचे कंत्राट असलेल्या मोहम्मद गुड्डू खान याने त्या मुलाला कामावर घेण्यापूर्वी त्याचे वय तपासले नाही. पीडित कुटुंबाचे वकील फहाद अली कुरेशी यांनी सांगितले की, त्या कामगाराची नेमणूक आणि देखरेख यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाच्या भूमिकेची तपासणी केली पाहिजे.

Maharashtra TimesMumbai Crime : ओल्या चादरीवरचे डीएनए, जजचा विश्वास बसेना; विलेपार्लेत फिजिओथेरपिस्ट अत्याचार-खून प्रकरणात फाशी सुनावलेला तरुण कसा सुटला?वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पडवे यांनी सांगितले की, ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने आरोपींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. “आम्ही आरोपींना नोटिसा बजावल्या आहेत कारण या प्रकरणात लावण्यात आलेल्या कलमांनुसार सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा