Pune Ganeshotsav 2026 : याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात मद्यविक्रीबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसार गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे शहरात मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे.
पुणे गणेशोत्सव २०२६ दारुबंदी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजित दराडे, पुणे : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच अवघी पुण्यनगरी भक्तिभावात न्हाऊन निघाली आहे. ढोल-ताशांचा गजर, आकर्षक रोषणाई आणि बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठांमध्ये उसळलेली गर्दी यामुळे शहरात उत्सवी वातावरण निर्माण झालं आहे. हा 10 दिवसांचा सोहळा अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पुणे शहर पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था चोख राहावी, यासाठी प्रशासनाने मद्यविक्रीवर कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला असून, काही विशिष्ट दिवशी संपूर्ण शहरात, तर मध्यवर्ती भागात सलग 12 दिवस दारूबंदीचे आदेश लागू केले आहेत.
प्रशासनाची अधिसूचना नेमकी काय?
प्रशासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला संपूर्ण पुणे शहर आणि उपनगरांमध्ये सर्व प्रकारची मद्यविक्री पूर्णपणे बंद राहील. यानंतर उत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी ज्या प्रमुख रस्त्यांवरून घरगुती व लहान मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघतात, त्या मार्गांवरील आणि लगतच्या परिसरातील दारूची दुकाने, बिअर बार आणि परमिट रूम्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उत्सवाचा मुख्य दिवस म्हणजेच 25 सप्टेंबर शुक्रवारी रोजी असणाऱ्या अनंत चतुर्दशीला संपूर्ण शहरात कडक ‘ड्राय डे’ पाळला जाईल. महत्त्वाचं म्हणजे, मानाच्या आणि प्रमुख गणपतींच्या विसर्जन मिरवणुका दुसऱ्या दिवसापर्यंत सुरू राहत असल्यानं 26 सप्टेंबर शनिवारी रोजी मिरवणुका पूर्णपणे शांततेत संपेपर्यंत संबंधित मार्गांवर दारूबंदी कायम राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Nanded Accident : मुलाला वकील बनवलं, लेकीला अधिकारी झालेलं पाहण्याचं स्वप्न अधूरं, नांदेड अपघातात आई-वडिलांना काळाने हिरावलं; कुटुंबाचा आक्रोश
प्रशासनानं विशेष लक्ष केंद्रित
या संपूर्ण नियमावलीत पुणे शहराच्या मध्यवर्ती पेठ परिसरावर प्रशासनानं विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. मानाचे पाच गणपती, प्रमुख विसर्जन मार्ग आणि प्रचंड गर्दी असणाऱ्या मंडळांचे केंद्र असलेल्या खडक, विश्रामबाग आणि फरासखाना या तीन संवेदनशील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 14 सप्टेंबर सोमवारपासून ते थेट 25 सप्टेंबरपर्यंत सलग 12 दिवस मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर 26 सप्टेंबरला विसर्जन मिरवणूक अखेरच्या टप्प्यात येऊन संपेपर्यंत या परिसरातील सर्व दारू दुकाने आणि परमिट रूम्सचे शटर बंदच ठेवावे लागणार आहेत.
Pune Crime : ऑनलाइन गेमिंग अन् बेटिंगच्या विळख्यात अडकून आयुष्य संपवलं, पुण्यातील MPSC करणाऱ्या प्रथमेश देशमुख प्रकरणात नवीन माहिती
दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत
उत्सवाच्या काळात मद्यपींमुळे निर्माण होणारे वाद, छेडछाडीच्या घटना आणि मिरवणुकांमध्ये उद्भवणारे तणाव रोखण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांमार्फत या भागातील सर्व बारमालक आणि दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. पुणेकरांनी या पवित्र सणाचं पावित्र्य राखून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन पोलीस यंत्रणेकडून करण्यात आलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा