Mumbai Crime: बहिणीला दाजीकडून होणारी मारहाण बघून भाऊ भांडण सोडविण्यासाठी गेला. पण दारुच्या नशेत टूण असण्याऱ्या दाजीने त्याचा जीव घेतला. काय घडलं नेमकं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरची बहीण ममता हिचा २०२१मध्ये आकाशसोबत विवाह झाला होता. आकाशला दारूचे व्यसन होते. रविवारी रात्री तो घरी आला आणि ममताला जेवण द्यायला सांगितले. तिने जेवण केले नसल्याचे सांगताच त्याचा राग अनावर झाला आणि त्याने ममताला मारहाण करण्यास सुरुवात केली. याच वेळी या ठिकाणी आलेला सागर मध्ये पडला आणि बहिणीची सुटका करू लागला. यामुळे संतापलेल्या आकाशने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये झटापट सुरू असतानाच आकाशने घरातील चाकू घेऊन सागरच्या मानेवर वार केले.
Mumbai Crime : आखातात युद्ध भडकलं, मुंबईतील तरुण IS च्या संपर्कात; कुर्ला-गोवंडीत ATS ची झाडाझडती, तिघं ताब्यात
या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरला पाहून आकाश पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या सागरला व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Eknath Shinde : ‘भाईं’कडून दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानाची व्यवस्था
तर दुसऱ्या एका घटनेत, धुलीवंदनाच्या निमित्ताने गिरगाव चौपाटी आणि मरिन ड्राइव्ह येथे फिरायला गेलेल्या दोन तरुणांना घरी परतताना लोकलमधून पडल्याने दुखापत झाली. ही घटना सायंकाळी सुमारे ७ वाजता घडली. महादेव मोरे व आकाश गाजबे हे दोघे धुलीवंदनानिमित्त मरिन ड्राइव्ह परिसरात फिरण्यासाठी गेले होते. दिवसभर फिरल्यानंतर त्यांनी वसईला जाण्यासाठी चर्चगेट रेल्वे स्थानकातून लोकल पकडली. लोकल वांद्रे-खार रोडदरम्यान धावत असताना दरवाजाजवळ उभे असलेल्या या दोघांचा अचानक तोल जाऊन ते रुळांलगत पडले. यात त्यांना तोंड व हाताला दुखापत झाली.
