• Mon. Mar 9th, 2026

    Satara Tourist: इराण-इस्रायल युद्धाचा सातारा जिल्ह्याला फटका; 34 जण दुबईत अडकले; मायदेशी परतण्यासाठी धडपड

    Satara Tourist: इराण-इस्रायल युद्धाचा सातारा जिल्ह्याला फटका; 34 जण दुबईत अडकले; मायदेशी परतण्यासाठी धडपड

    इराण-इस्रायल युद्धाच्या भडक्यामुळे सातारा जिल्ह्यातील ३४ जण दुबईत अडकले आहेत. हेल्थ इन्शुरन्सच्या सेमिनारसाठी गेलेले हे कर्मचारी सध्या हॉटेलमध्ये सुरक्षित असून, त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे.

    इराण इस्रायल युद्धामुळे साताऱ्यातील ३४ जण दुबईत अडकले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : नवी दिल्लीतील केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या सेमीनारसाठी गेलेले कर्मचारी आणि एजंट मिळून सातारा जिल्ह्यातील ३४ जण दुबईत अडकून पडले आहेत. सर्वजण सध्या हॉटेलमध्ये सुरक्षित असले तरी मायदेशी परतण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. युद्धजन्य परिस्थितीत आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने आज एक व्हॉटसॲप क्रमांक (+97150 365 4357) जारी केला आहे. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारकडून गरजूंना मदत केली जाणार आहे. केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींच्या संपर्कात आहेत. दोन-तीन दिवसात मायदेशी परतू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

    नवी दिल्लीतील केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या अनेक शाखा महाराष्ट्रात आहेत. कंपनीने दुबईत एका सेमीनारचे आयोजन केले होते. त्या सेमीनारसाठी सातारा जिल्ह्यातील ३४ जणांची निवड झाली होती. २७ फेब्रुवारीला सर्वजण दुबईला रवाना झाले होते. मात्र, त्यानंतर आखाती देशात युद्धाचा मोठा भडका उडाला. इराणने संयुक अरब अमिरातीवर हल्ले सुरू केले. दुबईला देखील लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे पर्यटकांसह व्यावसायिक कारणांसाठी गेलेले हजारो लोक दुबईत अडकले आहेत.

    Maharashtra TimesGovernment Hostel GR : शासकीय वसतिगृहांच्या नावातून ‘मागासवर्गीय’ शब्द वगळला; महापुरुषांची नावे मिळणार, सामाजिक न्याय विभागाचा ऐतिहासिक निर्णय

    दुबईतील प्रशासनाने परदेशी लोकांची संपुर्ण सोय मोफत केली आहे. परंतु, युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरीक भयभीत आहेत. साताऱ्यातील लोक एका हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. हॉटेलबाहेर पडू नये, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप तरी आम्हाला कसलाही धोका जाणवला नसल्याची माहिती केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या कराड शाखाधिकारी साधना पाटील यांनी सांगितले. तसेच विमानाची व्यवस्था होण्याची सर्वजण वाट पाहत आहेत.

    दरम्यान, इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. ताज्या अहवालांनुसार, २७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या हल्ल्यांमध्ये इराणमध्ये आतापर्यंत ७८० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी आणि नागरिकांचा समावेश आहे. इस्रायलमध्येही मृतांची संख्या तुलनेने कमी असली, तरी शेकडो नागरिक जखमी झाले आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा