• Wed. Aug 5th, 2026
    Crime News : सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावलं, रात्री PHD करणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार, नंतर गोळीही दिली; डिलिव्हरी बॉयचं कांड

    Chhatrapati Sambhajinagar Crime News : सामान पॅक करण्याच्या बहाण्याने घरी बोलावून एका 31 वर्षीय पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीवर डिलिव्हरी बॉयने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    घाटी पीएचडी विद्यार्थिनी डिलिव्हरी बॉय अत्याचार
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून एका डिलिव्हरी बॉयने 31 वर्षीय पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अत्याचार केल्यानंतर आरोपीने पीडितेला बळजबरीने गोळीही खाऊ घातली. ही धक्कादायक घटना 12 जुलै रविवारी रोजी रात्री घाटी परिसरातील एका क्वार्टरमध्ये घडली. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.

    सामान पॅक करण्यासाठी बोलावलं

    दीपक मधुकर भुक्तार (वय 35, रा. घाटी क्वार्टर, ह.मु. पडेगाव) असं आरोपीचं नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएचडीचं शिक्षण करणाऱ्या 31 वर्षीय पीडित तरुणीची सुमारे दोन महिन्यांपूर्वी आरोपी दीपक याच्याशी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाली होती. ओळखीचं रुपांतर पुढे मैत्रीत झालं. आरोपी दीपक हा घाटी परिसरातील एका शासकीय क्वार्टरमध्ये राहत होता. त्याला ती खोली रिकामी करण्याचे आदेश मिळाल्यानं त्याने 8 जुलै रोजी सायंकाळी सामान पॅक करण्यासाठी पीडितेला मदतीसाठी बोलावले. त्या रात्री उशीर झाल्यानं ती तेथेच थांबली; त्यावेळी आरोपीने तिच्याशी व्यवस्थित वर्तन केलं होतं.

    Maharashtra TimesPune Crime : भावजयांमध्ये वाद, वचपा काढण्यासाठी झोपलेल्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतले, ओठ चिकटले अन्…; पुण्यात अमानुषपणाचा कळस

    सामान पॅकिंगसाठी पुन्हा बोलावून अत्याचार

    त्यानंतर 12 जुलै रोजी उर्वरित सामान पॅक करण्याचं कारण सांगून आरोपीने पीडितेला पुन्हा क्वार्टरवर बोलावून घेतलं. रात्रीच्यावेळी आरोपीने तिच्यावर दोनदा अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 जुलै सोमवारी रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास त्याने पीडित तरुणीला बळजबरीनं एक गोळी खाऊ घातली आणि तिला समतानगर येथील तिच्या खोलीवर नेऊन सोडलं.

    Maharashtra TimesKalyan News : कुत्रा चावल्याने रेबिजचं इंजेक्शन, सुई चिमुकल्याच्या कमरेतच राहिली, एक्स-रे काढल्यावर प्रकार समोर; कल्याणमधील संतापजनक घटना
    घडलेल्या या प्रकारामुळे पीडित तरुणी प्रचंड मानसिक तणावाखाली आणि नैराश्यात गेली होती. सुरुवातीला बदनामीच्या भीतीनं तिने पोलीस स्टेशनमध्ये जाणं टाळलं. मात्र, या धक्कादायक प्रसंगातून स्वतःला सावरत आणि धाडस एकवटून तिनं 3 ऑगस्ट सोमवारी रोजी बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली आणि रीतसर तक्रार नोंदवली, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनीषा केदार करत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा