Mumbai Local Train Lost Gold Bag Returned : प्रवास करताना कुर्ला स्थानक ओलांडल्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिने असलेली आपली मौल्यवान बॅग शेजारी बाजूला ठेवली. लोकल भायखळा स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर पोहोचताच अन्सारी घाईघाईत खाली उतरले.
१२ लाख १५ हजारांचे दागिने जप्त
तल्हाह मोहम्मद झाकीर अन्सारी हे २ नोव्हेंबर २०२३ रोजी अंबरनाथहून ‘सीएसएमटी’कडे लोकलने प्रवास करत होते. कुर्ला स्थानक ओलांडल्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिने असलेली बॅग बाजूला ठेवली. लोकल भायखळा स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर आल्यानंतर ते खाली उतरले. मात्र, बॅग लोकलमध्येच राहिली. अन्सारी यांनी तातडीने मागची लोकल पकडून ‘सीएसएमटी’ गाठले. संबंधित लोकलमध्ये बॅगचा शोध घेतला; पण ती सापडली नाही. अखेर त्यांनी ‘सीएसएमटी’ रेल्वे पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपीचा माग काढण्यात आला. पोलिसांनी अख्तर हुसैन मुस्तफा हुसैन शेख याला शोधून त्याच्याकडून १२ लाख १५ हजारांचे दागिने जप्त करण्यात आले.
Nitin Gadkari: गडकरींना मोठा दिलासा! पोस्ट्स अत्यंत घृणास्पद, तात्काळ हटवा; मुंबई हायकोर्टाचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सना आदेश
हरवलेले दागिने अन्सारी यांना सुखरूप मिळाले
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडेयांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. रेल्वे स्थानकांतील सीसीटीव्ही फुटेज पिंजून काढले गेले. अखेर पोलिसांच्या हाती एक भक्कम सुगावा लागला आणि त्यांनी अख्तर हुसैन मुस्तफा हुसैन शेख या संशयिताला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपीकडून १२ लाख १५ हजार रुपयांचे संपूर्ण सोन्याचे दागिने जप्त केले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सर्व ऐवज अन्सारी यांच्याकडे सुपूर्द केला. तब्बल तीन वर्षांनंतर आपले हरवलेले दागिने अन्सारी यांना सुखरूप परत मिळाले.
मुंबईतील प्रकरण नेमकं काय?
मुंबईत एसआरए अंतर्गत फ्लॅट मिळवून देण्याच्या आमिषानं तब्बल 5.57 कोटी रुपयांची कथित फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रारदार आकाश राधेश्याम सोनी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुमारे 5 कोटी 57 लाख 50 हजार रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी FIR दाखल करून तपास सुरू केला आहे.
D Y Patil : डॉ. डी वाय पाटलांचं निधन; राजकीय वैमनस्य बाजूला, कट्टर विरोधक भाजप आमदार अमल महाडिक बंटी पाटलांच्या सांत्वनाला
तक्रारीनुसार, 2017 मध्ये तक्रारदार आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार रिअल इस्टेटचा व्यवसाय करत होते. त्याचकाळात त्यांचीशैलेश काकण आणि त्याच्या सहकाऱ्याशी ओळख झाली. त्यांनी SRA चे फ्लॅट उपलब्ध करून देण्याचा दावा केला. तसेच स्वतःचे SRA अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींशी संबंध असल्याचं सांगून अंधेरी, सांताक्रूज, वांद्रे, कांदिवली आणि माटुंगा परिसरात फ्लॅट मिळवून देण्याचं आश्वासन दिल्याचा आरोप आहे.
