• Fri. Mar 6th, 2026
    आंतरजातीय लग्नामुळे बहिष्कृत, पाच वर्षांनी विवाहिता सन्मानाने माहेरी, जातपंचायत बरखास्त

    Nashik Woman Boycott : समाजात मुलीला आंतरजातीय विवाह करण्यास बंदी असल्यामुळे तिच्या जातपंचायतीने तिला व तिच्या परिवाराला जात बहिष्कृत केले होते.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आंतरजातीय विवाह केल्याने ‘तिला’ जातपंचायतीकडून बहिष्कृत करण्यात आले होते. पाच वर्षांपासून ‘ती’ आपल्या माहेरी जाऊ शकली नव्हती. मात्र, गुरुवारी (दि. २६ फेब्रुवारी) ‘ती’ सन्मानपूर्वक माहेरी गेली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि अंधश्रद्धा निरर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ‘तिचा’ पुन्हा माहेरवाशीण बनण्याचा मार्ग सुकर झाला.

    काय आहे प्रकरण?

    मनीषा (नाव बदलले आहे.) ही भटके विमुक्त प्रवर्गातील असून, तिच्या अंगावर पांढरे डाग (कोड) असल्याने अशी स्त्री धार्मिक कार्यात चालत नाही, अशा अंधश्रद्धेमुळे तिच्याशी जातीतील चांगला मुलगा लग्नासाठी तयार होत नव्हता. मग तिने अन्य समाजातील चेतनसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला. तिच्या समाजात मुलीला आंतरजातीय विवाह करण्यास बंदी होती. त्यामुळे तिच्या जातपंचायतीने तिला व तिच्या परिवाराला जात बहिष्कृत केले. तिच्या परिवाराने ५१ हजार रुपये दंड भरून जातीत प्रवेश मिळवला. पण, मनीषावरचा बहिष्कार कायम राहिला. गेल्या पाच वर्षांपासून ती आपल्या माहेरी जाऊ शकली नव्हती. तिला तिच्या भावाच्या लग्नाला उपस्थित राहता यावे, अशी कैफियत तिने जातपंचायत मूठमती अभियान तथा ‘अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे यांच्याकडे मांडली. चांदगुडे यांनी करणाऱ्या डॉ. गोऱ्हे यांची मदत घेतली.
    Maharashtra TimesVSR चे मालक रोहित सिंह यांना अटक करा, व्हिडिओ शेअर करत अजित दादांचे पुत्र जय पवारांची मागणी

    ..अन् बहिष्कार उठला

    डॉ. गोऱ्हे यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांनी पोलिस महानिरीक्षांसोबत बैठक घेतली. त्यानुसार त्यांनी नंदुरबारच्या पोलिस अधीक्षकांना मनीषाला सुरक्षा पुरवून लग्नाला हजर राहण्याप्रकरणी मदत करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे अक्कलकुवा पोलिस ठाण्यात जातपंचायतीच्या पंचांना बोलावल्यावर तिने लग्नास येण्यास अडसर नसल्याचे त्यांनी लिहून दिले. त्यामुळे बहिष्कार उठल्यामुळे आपल्या भावाच्या गुरुवारी झालेल्या विवाहास मनीषा हजर राहिली. आपले आई-वडील,भाऊ , बहीण व नातेवाइकांना ती पाच वर्षांनंतर प्रथमच भेटली. समाजाने तिचा सन्मानपूर्वक स्वीकार केला. याबद्दल तिने आनंद व्यक्त करीत तिला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
    Maharashtra TimesSudhakar Shrotri : अभिनेते पुष्कर श्रोत्री यांना पितृशोक, ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक सुधाकर श्रोत्री यांचं निधन
    ‘अंनिस’ने एका बाजूने संबंधित जातपंचायतीच्या पंचांशी सुसंवाद साधत आणि दुसऱ्या बाजूने कायद्याचा धाक दाखवत जातपंचायत बरखास्त करण्याची विनंती केली. पंचांनीदेखील मोठ्या मनाने त्यास होकार दिला. त्यानंतर शुक्रवारी (दि. २७) नाशिक येथे त्यांची जातपंचायत बरखास्त करीत आंतरजातीय विवाहांनाही परवानगी देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.

    Nitin Gadkari | मुंबई, बंगळुरु प्रवाशांसाठी खूशखबर, नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा