• Fri. Mar 6th, 2026
    Maharashtra Live News 2nd March 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    Tejas Express : रेल्वेच्या नावाने ‘शिमगा’! तेजस एक्सप्रेसला 7 तास उशिर; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल

    शिमग्याच्या सणानिमित्त कोकणात जाण्यासाठी रेल्वेस्थानकांत आलेल्या कोकणवासीयांना रखडलेल्या तेजस एक्स्प्रेसमुळे रविवारी सकाळी स्थानकांतच बराच काळ रखडून राहावे लागले. सकाळी ५.५० वाजता मुंबई सीएसएमटी रेल्वेस्थानकातून सुटणारी ही एक्स्प्रेस तब्बल सात तास उशिरा, म्हणजे दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांनी सुटली. यामुळे सकाळी लवकर रेल्वेस्थानकात एक्स्प्रेस पकडण्यासाठी दाखल झालेल्या प्रवाशांना सीएसएमटी, दादर, ठाणे आणि पनवेल रेल्वेस्थानकात खोळंबून राहावे लागले. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलावर्ग यांचे यामुळे प्रचंड हाल झाल्याने प्रवाशांनी कोकण रेल्वेच्या नावाने अक्षरश: ‘शिमगा’ केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *