• Fri. Sep 11th, 2026

महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे नवी मुंबईत आयोजन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Feb 28, 2026
महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे नवी मुंबईत आयोजन – महासंवाद

मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने “महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा”  या  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार ०१ मार्च, २०२६ रोजी दु. १२:०० वाजता, भूमिपुत्र भवन, उलवे, नवी मुंबई येथे होणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक  कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेत स्त्री ही शक्ती, त्याग आणि प्रेरणेचे प्रतीक मानली जाते. महिला लोककलांमध्ये विविध लोकगीत आणि नृत्याचे प्रकार आहेत, ज्यामध्ये पारंपरिक वेशभूषा, संगीत आणि नृत्यशैलींचा समावेश असतो. महिलांच्या या कला, कौशल्ये आणि सामाजिक स्थानाला योग्य महत्त्व देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याकरिता नृत्य, गीत, नाटिका आणि विविध सादरीकरणांद्वारे स्त्रीशक्तीचा जागर मांडला जाईल. या सांस्कृतिक कार्यक्रमातून स्त्री सक्षमीकरणाचा संदेश सर्वांपर्यंत पोचविण्याचा उद्देश आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून, नवी मुंबई परिसरातील कलाप्रेमींनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य  संचालक श्रीराम पांडे  यांनी केले आहे.

या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते भजनी मंडळांना भांडवली अनुदान योजनेंतर्गत धनादेश वाटप करण्यात येणार आहे.

000

संजय ओरके/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *