• Tue. Sep 8th, 2026

एकच दादा, अजित दादा! रोहित पवारांच्या नावाने घोषणा देताच कार्यकर्त्याला ठणकावलं

एकच दादा, अजित दादा! रोहित पवारांच्या नावाने घोषणा देताच कार्यकर्त्याला ठणकावलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आमदार रोहित पवार हे आपले काका आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या सखोल तपासासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित करत रोहित पवार स्वतः सत्य शोधण्यासाठी लढत आहेत. पत्रकार परिषद घेत, पुरावे सादर करत अजित पवारांचा अपघात नाही तर घातपात असू शकतो, असे वारंवार सांगताना दिसत आहेत. मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवून न घेण्यात आल्याने गुरुवारी रोहित पवार आणि युगेंद्र पवार बारामतीतील पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. सामान्य बारामतीकर आणि कार्यकर्ते सुद्धा यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचसोबत अनेक वकील देखील यावेळी उपस्थित राहिले होते. बारामती पोलिसांनी देखील FIR नोंदवून न घेतल्याने भावनिक झालेल्या रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेनंतर रोहित पवार कार्यकर्त्यावर संतापल्याचं चित्र पाहायला मिळालं. “रोहित दादा, आगे बढो” अशी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला रोहित पवारांनी ठणकावलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed