Weather Update 27 February: राज्यात पुन्हा एकदा तापमान वाढायला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार दिवसभर हवामान कसं असेल?
हवामान विभागाचा ताजा अंदाज
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि त्या शेजार भागात सध्या चक्राकार वारे सक्रिय आहेत तसेच दक्षिण कर्नाटकातही असे वारे आहे. राज्यात निर्माण झालेल्या दुहेरी हवामानाचं हेच कारण आहे. दोन्ही दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामान सतत बदलतं आहे. हवामान विभागाने असाही अंदाज वर्तवला आहे की चक्राकार दाबाचा परिणाम मराठवाडा प्रदेशापर्यंत जाणवत आहे आणि प्राथमिक अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा सक्रिय राहण्याची अपेक्षा आहे. IMD दिलेल्या माहितीनुसार, “पुढील 24 तासांत, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तर किनारी भागात दमट परिस्थितीमुळे उष्णता अधिक तीव्र होऊ शकते.”
Bellasis Bridge: बेलासिस पूल प्रवाशांसाठी खुला, मुख्यमंत्र्यांकडून नामांतर; ताडदेव, मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणाऱ्या पुलाचं नवं नाव काय?
कोकण किनारपट्टीवर दमट वातावरण
कोकण किनारपट्टी आणि मुंबईमध्ये हवामान दमट आणि उष्ण राहील. तापमान अनेक जिल्ह्यांत 32-35 अंश सेल्सिअस दरम्यान राहत असल्यामुळे नागरिकांना उन्हाचा कडाका जाणवत आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही वातावरण उष्ण राहून कोरडं असणार आहे. या जिल्ह्यांत पावसाची शक्यताही नाही त्यामुळे आकाश दिवसभर निरभ्र राहील.
Driving License: श्रेणीआधारित वाहन परवाना लवकरच सुरू, नियम मोडल्यास थेट लायसन्स होणार रद्द; नितीन गडकरींचे स्पष्ट निर्देश
मुंबईत उन्हाच्या झळा
दरम्यान, मुंबईमध्ये वाढू लागलेल्या उन्हाचा परिणाम दिसू लागला आहे. चेहऱ्याभोवती गुंडाळले जाणारे स्कार्फ, एसी लोकलमधील वाढलेली गर्दी, स्थानकांवरही थंड पेयांच्या स्टॉलवर वाढलेली वर्दळ हे त्याचे चिन्ह आहेत. महामुंबई परिसरात आर्द्रता वाढल्याने तसेच, तापमानही अधिक असल्याने उष्म्याची जाणीव तीव्र होऊ लागली आहे. फेब्रुवारीअखेरीस ऋतुबदलाची चाहूल लागल्यानंतर मुंबईतही तापमानातील बदल जाणवू लागला असून असह्य उकाड्याने मुंबईकरांची काहिली होऊ लागली आहे.
