• Sat. Mar 7th, 2026

    Konkan Railway: कोकण रेल्वेकडून शिमग्यासाठी अनारक्षित ट्रेन, दिवा-चिपळूणदरम्यान विशेष सेवा; कुठे असतील थांबे?

    Konkan Railway: कोकण रेल्वेकडून शिमग्यासाठी अनारक्षित ट्रेन, दिवा-चिपळूणदरम्यान विशेष सेवा; कुठे असतील थांबे?

    Holi Special Trains: शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी दिवा-चिपळूण विशेष मेमू रेल्वे सुरू करणार आहेत. ही अनारक्षित ट्रेन असून यासाठी प्रवाशांना आधीपासून बुकिंग करावी लागणार नाही.

    रत्नागिरी: कोकणात शिमगोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते. कोकणात येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून दिवा ते चिपळूण अशी अनारक्षित कोकण रेल्वे मार्गावर मेमू गाडी चालवली जाणार आहे. त्यामुळे कोणती तिकीट न बुक करता थेट या गाडीने प्रवास करता येणार आहे. ही मेमू विशेष गाडी 1 मार्च 2026 ते 8 मार्च 2026 या कालावधीत दररोज दोन्ही मार्गांवर धावणार आहे.

    वेळापत्रक पाहा

    शिमग्यासाठी मुंबई, ठाण्यावरून अनेक नागरिक कोकणात जातात. यामुळे रेल्वे गाड्यांचं बुकिंग मिळणं कठीण होतं. अशा वेळी अनारक्षित रेल्वे सेवा सुरू केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ही मेमू गाडी क्रमांक 01159 ही रात्री 11 वाजून 25 मिनिटांनी दिवा स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी चिपळूण येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01160 ही दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी चिपळूणहून सुटून रात्री 11:10 वाजता दिवा येथे पोहोचेल.Maharashtra TimesKarjat-Panvel Railway: कर्जत-पनवेल थेट लोकलने प्रवास, डोंगरातून बोगदा तयार; 29 किमी लांब मार्गिकेने 30 मिनिटांत होणार अंतर पार

    अनारक्षित मेमू गाडीला असे असतील थांबे

    या गाडीला दिवा, निळजे, तळोजे, कळंबोली, पनवेल, सोमटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी आणि चिपळूण अशा अनेक स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

    या अनारक्षित गाडीमुळे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भक्तांचा प्रवासाचा ताण काहीसा कमी होणार आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव जंक्शनदरम्यान विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

    Maharashtra TimesNashik-Akkalkot Highway: नाशिक-अक्कलकोट महामार्गाला गती! 30 गावांमधून जाणार रस्ता; कसा असेल 374 किमी लांब मार्ग?

    मडगाव ते एलचटीटीदरम्यान गाडी

    ट्रेन क्रमांक 01004 मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल असून ही मडगाववरून दुपारी 4.30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 6.20 ला लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहचेल. ही ट्रेन 1 ते 8 मार्चदरम्यान धावणार आहे. शिवाय गाडी क्रमांक 01003 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शनदरम्यान विशेष रेल्वे सुरु होणार आहे. ही गाडी 2 मार्च ते 8 मार्चदरम्यान रोज सकाळी 8.20 ला LTTवरून सुटून त्याच दिवशी रात्री 22.40 ला मडगाव जंक्शनला पोहचेल.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा