सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाने भाजप विरोधात आज थेट मुंडन आंदोलन केलं. महापौर पदावर मराठा समाजाची वर्णी न लागल्याने मराठा क्रांती मोर्चा संघटना आक्रमक झालेली बघायला मिळाली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इरफान शेख, सोलापूर : “सोलापुरात मराठा समाजावर वारंवर राजकीय अन्याय होत आला आहे. 1993 साली मराठा समाजाचा महापौर झाला होता. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश आले आहे. 102 पैकी 87 नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. सोलापुरात मराठा समाजाची मतदारसंख्या आणि लोकसंख्या ही निर्णयाक भूमिका घेण्यासारखी आहे. सोलापूरच्या महापौर निवड करताना मराठा समाजाला प्राधान्य देणे गरजेचे होते. विनायक कोंड्याल यांना महापौर केले. त्यामुळे सोलापूर मधील मराठा समाज भाजपवर नाराज आहे”, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाची आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांनी मंगळवारी दुपारी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर स्वतःचे मुंडन करून भाजपचा निषेध केला आणि पालकमंत्री जयकुमार गोरेंवर रोष व्यक्त केला.
विद्यमान महापौरांनी राजीनामा देण्याची आंदोलकांची मागणी
सोलापुरात भाजपच्या स्थानिक काही प्रमुख राजकीय व्यक्तींनी मराठा समाजावर राजकीय अन्याय केल्याचा आरोप करत राम जाधव यांनी रक्ताने पत्र लिहिलं. तसेच आज मंगळवारी दुपारी मराठा समाजाचा महापौर का केला नाही? असा सवाल करत मुंडण आंदोलन करण्यात आले. ही वेळ या राजकीय लोकांनी मराठा समाजावर का आणली? मराठा समाजावर झालेल्या राजकीय अन्याय विरोधात मराठा आंदोलक तथा मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक राम जाधव यांनी स्वतःच मुंडन केले. सोलापूरच्या विद्यमान महापौरांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही राम जाधव यांनी केली आहे. जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही तेव्हा पर्यंत हा लढा चालू राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘1993 नंतर मराठा समाजाचा महापौर झालाच नाही’, आंदोलकांची भूमिका
“1993 नंतर 32 वर्षापासून मराठा समाजाला महापौर पदापासून वंचित ठेवले होते. यंदा 3 दशकानंतर मराठा समाजाचा महापौर करण्याची भाजपला संधी असताना भाजपच्या शहरातील काही प्रमुख लोकांनी मराठा समाजाचा महापौर होऊन दिला नाही. 1993 नंतर 3 वेळा-पद्मसाली समाजाला, 2 वेळा- मुस्लिम समाजाला, 2 वेळा-लिंगायत समाजाला, 2 वेळा- बंजारा समाजाला, तर एकदा ब्राह्मण, कैकाडी, धनगर समाजाला विविध पक्षांतून न्याय देण्यात आला आहे”, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा