• Sun. Jun 7th, 2026
    विधानपरिषद लक्षवेधी – महासंवाद

    माहीम मच्छिमार कॉलनीच्या समूह पुनर्विकासाबाबत सकारात्मक निर्णय घेणार – मंत्री शंभूराज देसाई

    मुंबई, दि. २४ : मुंबईतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा भाग असलेल्या माहीम येथील मच्छिमार कॉलनीच्या समूह पुनर्विकास प्रस्तावासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेतसांगितले.

    विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य सर्वश्री सुनील शिंदे, प्रवीण दरेकर, अनिल परब आणि सचिव अहिर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

    मंत्री देसाई म्हणाले की, या प्रकल्पाला विलंब होत असल्याबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने म्हाडा उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर बृहन्मुंबई व उपनगरातील २० एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या म्हाडा अभिन्यासांचा एकत्रित/समूह पुनर्विकास करण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार क्लस्टर पद्धतीने विकासाला गती देण्यात येईल, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

    0000

    काशीबाई थोरात/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *