• Sun. Jun 14th, 2026
    Smart Meter : ‘स्मार्ट मीटर’ मोहिमेला वेग, मेसेजनंतर 48 तासांत मीटर घरी, अचूक वीजवापर कळणार; स्मार्ट मीटरचे फायदे काय?

    Smart Meter Project : राज्यात आता स्मार्ट मिटर बसविण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय. महावितरणकडून ग्राहकांना पूर्वसूचना देण्यात येणार आहेत. मेसेजनंतर ४८ तासांत मीटर मिळणार आहेत.

    स्मार्ट मीटर म्हणजे काय?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यभरातील सर्व वीजग्राहकांचे पारंपरिक वीजमीटर बदलून स्मार्ट मीटर मोफत बसविण्याच्या मोहिमेला ‘महावितरण’ने गती दिली आहे. त्या अंतर्गत थेट व्हॉट्सअपवर अधिकृत मेसेज पाठवून मीटर बदलण्याच्या प्रक्रियेची पूर्वसूचना देण्यात आली आहे. हा मेसेज मिळालेल्या ग्राहकाकडे ४८ तासांनंतर स्मार्ट मीटर बसविण्यात येईल, असा दावा ‘महावितरण’ने केला आहे.

    १४ लाख ग्राहकांकडे स्मार्ट मीटर

    वीजग्राहकांना त्यांच्या वीजवापराची अचूक माहिती देण्यासाठी स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. राज्यात एक कोटी १४ लाखांहून अधिक ग्राहकांकडे स्मार्ट मीटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे परिमंडळातील ३९ लाख ग्राहकांपैकी १४ लाख ग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत. उर्वरित २५ लाख ग्राहकांकडे नवीन स्मार्ट मीटर जोडण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. या कामाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना पूर्वकल्पना देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
    Maharashtra TimesSanjay Raut: सत्ताधाऱ्यांकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना संपवण्याचं कारस्थान; संजय राऊतांचा घणाघात
    ‘स्मार्ट मीटरिंग ही वीज वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणारी प्रणाली आहे. मीटर बदलण्याच्या प्रक्रियेसाठी ग्राहकांनी ‘महावितरण’च्या किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे,’ असे आवाहन ‘महावितरण’ प्रशासनाने केले आहे.

    अचूक वीजवापर कळणार

    केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत (आरडीएसएस) स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. वीजबिलांच्या आकारणीबाबत ग्राहकांच्या मनात अनेक शंका-कुशंका असतात. त्यातून वीजबिले वाढीव येत असल्याच्या शेकडो तक्रारी ‘महावितरण’कडे केल्या जातात. वीजबिलांवरील वादातून ‘महावितरण’चे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वादाच्या घटना घडतात. स्मार्ट प्रीपेड मीटरचा वापर सुरू झाल्यावर हे प्रकार कमी होणार आहेत.
    Maharashtra TimesWeather Update: मान्सूनसाठी २० जून उजाडणार? महामुंबईत ‘चटका’ कायम राहणार; मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट

    स्मार्ट मीटरचे फायदे

    वीजबिल प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप दूर होऊन ग्राहकांचा वेळ वाचणार.

    मोबाईल अॅपद्वारे ग्राहकांना विजेच्या वापराचे व्यवस्थापन करता येणार.

    स्मार्ट मीटर लावलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापराबद्दल प्रतियुनिट ८० पैशांची सवलत मिळेल.

    वीजसेवा, बिलांसंदर्भातील शंकांचे तातडीने निराकारण होणार.

    वीजचोरी, मीटरमधील फेरफाराला आळा बसणार.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा