Mumbai Local Update: मुंबईमध्ये हार्बर लाइनवर नुकत्याच एसी लोकल फेऱ्या वाढवल्या आहेत. यामुळे प्रवाशांना फायदा होणार अशी आशा होती. पण प्रत्यक्षात उलटच घडतं आहे. एसी लोकलमुळे सामन्य लोकलचंही वेळापत्रक कोलमडलं आहे.
एसी लोकच्या दरवाज्यात प्रवासी उभे
प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर हार्बर मार्गावर एसी लोकल सुरू झाली. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत प्रत्येकी एक फेरी यांसह एकूण १४ फेऱ्या सुरू झाल्या. पहिल्या दिवसापासून एसी लोकल विलंबाने धावू लागली. हार्बरवरील एसी लोकलला जवळपास महिना पूर्ण होत असला तरी एसी आणि सामान्य लोकल सातत्याने २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. मानखुर्द, गोवंडी, चेंबूर अशा रेल्वे स्थानकांवर काही प्रवासी एसी लोकलच्या दरवाज्यात उभे असतात.
Ranchi Plane Crash: रुग्णाला उपचारासाठी नेत असताना विमान कोसळलं; रांची-दिल्ली विमान दुर्घटनेत 7 जणांचा बळी; अपघात नेमका कसा घडला?
त्यामुळे दरवाजा पूर्ण बंद होण्यास अडचणी निर्माण होतात. परिणामी नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ लोकल फलाटावर रेंगाळते. त्याचबरोबर लोकलच्या दरवाज्यात देखील तांत्रिक बिघाडामुळे दरवाजे उघड-बंद होण्यासाठी अधिक वेळ लागतो. दरवाजे पूर्ण बंद झाल्याशिवाय एसी लोकल धावती करणे शक्य होत नाही. एसी लोकलला विलंब झाल्यास त्याचा परिणाम त्या मागे धावणाऱ्या सामान्य लोकल फेऱ्यांवर होतो. विलंबाने पोहोचलेली गाडी विलंबाने रवाना होते, यामुळे हार्बर मार्गावरील एसी आणि सामान्य लोकल फेऱ्या विलंबाने धावत असल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तुम्हाला एसी लोकलने प्रवास करायचा आहे?
ऐनवेळी एसी लोकल रद्द होण्यामुळे प्रवाशांकडून एसी तिकिटाचा परतावा मागण्यात येतो. अशावेळी प्रवासी आणि तिकीट विक्री केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्ये वाद होतो. हे टाळण्यासाठी तुम्हाला एसी लोकलने खरच प्रवास करायचा आहे का, तुम्हाला एसी लोकलचे तिकीट हवे आहे का, असे प्रश्न विचारून खात्री केल्यानंतरच कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना तिकीट देण्यात येते, असे हार्बर रेल्वे स्थानकातील रेल्वे कर्मचाऱ्याने सांगितले.
Mumbai Melody Road: दिवस-रात्र वाजणाऱ्या गाण्याने रहिवासी वैतागले, ‘मेलडी रोड’चा प्रयोग बनलाय त्रासदायक; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत…
उपाय हवा, कारणे नको…
हार्बरवरील काही स्थानकांवर प्रवासी दरवाजे अडवत असल्यास निवडक स्थानकांवर आरपीएफ कर्मचारी नियुक्ती करावी. दोषींवर कारवाई करावी. एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड असल्यास त्याबाबत आयसीएफला पत्र लिहून तातडीने दोष दूर करण्याच्या सूचना द्याव्यात. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर देखील याच बनावटीच्या एसी लोकल धावत आहेत. यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने कारणे देण्यापेक्षा उपाय करावे, असे प्रवासी निरंजन वारे बर्वे यांनी सांगितले.
