GMLR Twin Tunnels: गोरेगाव मुलुंड लिंक रोडवरील जुळ्या बोगद्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. टनेल बोरिंग मशीनची जोडणी पूर्ण झाली की सुरक्षा चाचण्या पूर्ण करून खोदकाम सुरू होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या तिसऱ्या टप्प्यात जुळ्या बोगद्यांचं बांधकाम सुरु होण्याच्या मार्गावर आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात फेज 3-बी अंतर्गत लिंक रोडसाठी बोगद्यांचं बांधकाम होणार आहे. यासाठी शाफ्ट तयार झालं असून, शाफ्टच्या आतमध्ये टनेल बोरिंग मशीनला जोडण्यात येत आहे. महापालिकेचे आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी काही दिवसांपूर्वी साइटला भेट देऊन कामांची पाहणी केली.
खोदकाम कधी सुरू होणार?
या टनेल बोरिंग मशीनचे सर्व भाग एकदा जोडले की साइटची सुरक्षा चाचणी होईल. या चाचणीत मशीनचा तपास करून सर्व यंत्रणा सुरळीत काम करत आहेत याची खात्री पटली की पुढील कामाला सुरूवात होणार आहे. तेव्हाच जुळ्या बोगद्यांचं खोदकाम प्रत्यक्ष रुपात सुरू होणार आहे. हे यंत्र जोडण्याचं काम जूनच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Mumbai Metro: महामुंबईत 14 मार्गांवर 300 किमी लांब ‘मेट्रो नेटवर्क’ उभारणार; वर्षाअखेरीस 120 किमीचा टप्पा होणार पार
यासह दुसरं टनेल बोरिंग मशीन जोडण्याचं कामसुद्धा सुरू झालं आहे. त्यानंतर येत्या काही महिन्यांत बोगद्यांचं काम सुरू होईल. हे काम सध्या प्रगतीपथावर सुरू असून जुळ्या बोगदे ऑक्टोबर 2026पर्यंत सुरू करण्याचं महापालिकेचं उद्दिष्ट आहे. संपूर्ण गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा मार्ग डिसेंबर 2028पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोडचा मार्ग तब्बल 12.20 किलोमीटर लांब आहे. मुंबई पूर्व ते पश्चिम प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.
कसा असेल लिंक रोडचा मार्ग?
लिंक रोड च्या मार्गावरील सर्वात महत्त्वाकांक्षी टप्पा म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारे जुळे बोगदे. हे बोगदे 4.70 किलोमीटर लांब असतील. प्रत्येक बोगद्यामध्ये तीन लेन असतील. गोरेगव-मुलुंड लिंक रोडसाठी तब्बल 14,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मुंबई शहरातील चौथा ईस्ट-वेस्ट कॉरिडोर असेल. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गांमध्ये थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. नागरिक जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आणि पवईसारख्या कोंडीच्या भागांना बायपास करून थेट पूर्व ते पश्चिम प्रवास करू शकतात. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ 75 मिनिटांवर 20 ते 25 मिनिटांवर येणार आहे.
ST Bus: एसटी स्थानकं, बस, विश्रांतीगृहे होणार अधिक स्वच्छ, दर चार तासांनी साफ-सफाईची व्यवस्था; कधीपासून सुरू होणार?
पहिल्या दोन टप्प्यात जुन्या मार्गांचं रुंदिकरण आणि काही ठिकाणी पुलांचं बांधकाम सुरू केलं आहे. तिसऱ्या टप्प्यात जुळ्या बोगद्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय उद्यान आणि आरे कॉलनी खालून जाणारा हा बोगदा गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रिनगरीपासून सुरू होऊन मुलुंडमधील खिंडीपाड्यापर्यंत पोहोचेल. चौथ्या आणि अंतिम टप्प्यात नाहूर ते ऐरोली उड्डाणपुलाचा समावेश आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा