• Tue. Sep 15th, 2026

१७ वर्षांपूर्वी लावलेलं झाड, अजित दादांच्या आठवणी, सुनेत्रा पवारांसाठी भावुक क्षण

१७ वर्षांपूर्वी लावलेलं झाड, अजित दादांच्या आठवणी, सुनेत्रा पवारांसाठी भावुक क्षण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अजित पवार यांच्या आठवणींची साक्ष देणाऱ्या झाडाच्या सावलीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी क्षणभर विसावा घेतला. सुनेत्रा पवार या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला सुनेत्रा पवारांनी उपस्थिती लावली. याचवेळी अजित पवार यांची आठवण करून देणारे काही भावुक क्षणही पाहायला मिळाले. आमदार शेखर निकम यांच्या शिक्षण संस्थेच्या परिसरात दिवंगत नेते अजित पवार यांनी वृक्ष लागवड केली होती. १७ वर्षांपूर्वी लावलेलं रोपटं आज बहरलेला वृक्ष बनलाय. त्याच झाडाचे दर्शन यावेळी सुनेत्रा पवार यांनी घेतलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed