Mumbai Local Mega Block Updates: ब्लॉकवेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वे
स्थानक – मुलुंड ते ठाणे
मार्ग – अप आणि डाउन धीमा
वेळ – सकाळी ११ ते दुपारी ४
परिणाम – ब्लॉकमुळे अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
BMC Budget 2026: मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला; यंदाही विविध प्रकल्पांसाठी भरीव तरतुदीची शक्यता
हार्बर रेल्वे
स्थानक – पनवेल ते वाशी
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५
परिणाम – सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर आणि ठाणे ते पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. बेलापूर-उरण-खारकोपर मार्गिकांवर लोकल वेळापत्रकानुसार उपलब्ध राहणार आहेत.
Pratap Sarnaik: लालपरी सुसाट! एसटीच्या ताफ्यात लवकरच 8 हजार नवीन बसेस; परिवहनमंत्री सरनाईकांची माहिती
पश्चिम रेल्वेे
स्थानक – वसई रोड ते विरार
मार्ग – अप आणि डाउन धीमा
वेळ – शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.१५ ते पहाटे ४.१५
स्थानक – बोरिवली ते दहिसर
मार्ग – सर्व मार्गिका
वेळ – शनिवारी मध्यरात्रीनंतर २.१० ते ४.१०
परिणाम – वसई रोड ते दहिसरदरम्यान अप आणि डाउन मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. बोरिवली ते दहिसरदरम्यान पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यात येणार आहे. यामुळे काही मेल-एक्स्प्रेस आणि लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
Sharad Pawar: …तरच शरद पवार राज्यसभेवर जाणार! तेव्हा माढाचा पाढा अन् आता सुटेना तिढा; गणित कुठे अडकलं?
खारबावमध्ये डीएफसीसाठी ब्लॉक
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (डीएफसी) प्रकल्पाच्या कामासाठी मध्य रेल्वेने खारबाव स्थानकात आज, शनिवारी मध्यरात्रीनंतर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.३० ते रविवारी सकाळी ७.३० पर्यंत ब्लॉक असणार आहे. यामुळे पनवेल-डहाणू मेमू गाड्या रद्द करण्यात येणार असून काही रेल्वेगाड्या विलंबाने धावणार आहेत.
ब्लॉकच्या वेळेत पनवेल-डहाणू रोड, दिवा-वसई रोड, डोंबिवली-बोईसर, वसई रोड-दिवा, वसई रोड-पनवेल, बोईसर-वसई रोड, वसई रोड-दिवा मेमू गाड्या रद्द असणार आहेत. डहाणू रोड-पनवेल मेमू कामन रोडवर थांबवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक २२१७८ सिकंदराबाद-राजकोट एक्स्प्रेस भिवंडी स्थानकात दीड तास थांबवण्यात येईल. ब्लॉकमुळे काही मेल-एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्या ३० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
