• Fri. Mar 6th, 2026

    Chhatrapati Sambhajinagar Accident: मोठ्या थाटामाटात झालं लग्न, पण पहाटे 3 वाजता वऱ्हाडाच्या वाहनाचा भीषण अपघात; 35 प्रवाशांसह टेम्पो उलटला

    Chhatrapati Sambhajinagar Accident: मोठ्या थाटामाटात झालं लग्न, पण पहाटे 3 वाजता वऱ्हाडाच्या वाहनाचा भीषण अपघात; 35 प्रवाशांसह टेम्पो उलटला

    Accident News: शुक्रवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या एका आयशर टेम्पोचा अपघात झाला असून प्रवाशांसह तो टेम्पो उलटला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: शुक्रवारी जिल्ह्यात एका भीषण अपघातामुळे खळबळ उडाली आहे. लग्नच्या आनंदादरम्यान वऱ्हाडाच्या वाहनाचाच भीषण अपघात झाल्यामुळे शोकाकुल वातावरण निर्माण झालं आहे. जळगाव जिल्ह्यातून श्रीरामपूरकडे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला सिल्लोड-भराडी रस्त्यावरील आंबा फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला.

    एका महिलेचा मृत्यू

    शुक्रवारी २० फेब्रुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्याने टेम्पो रस्त्या कडेला असलेल्या वीज खांबाला धडकून उलटला. या दुर्दैवी घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. रेखाबाई वसंत गोसावी रा. बोदवड यांचा मृत्यू झाला आहे. तर सविता गोसावी ४०, सरुबाई गोसावी ५०,वसंताबाई कोळी ६५, ममता कोळी ११, साहिल सपकाळ १३, पुरुषोत्तम तायडे ११, प्रमिलाबाई गोसावी ५५ हे जखमी झाले आहे.Maharashtra TimesCrime News : आई, तू दुसरा नवरा केलास, मी पुन्हा लग्न केलं तर काय? सख्ख्या माऊलीने जीव घेतला, महाराष्ट्र हादरवणाऱ्या खून प्रकरणाचा छडा

    या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेले वऱ्हाडी एका आयशर टेम्पोने क्रमांक MH-19-CX-3254 श्रीरामपूरकडे जात होते. सिल्लोड शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबा फाट्याजवळ चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो वीज खांबाला धडकला आणि उलटला. अपघाताच्या वेळी टेम्पोमध्ये महिला, वृद्ध आणि मुलांसह सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते.

    पोलिसांची सतर्कतामुळे ३५ जणांचे वाचले प्राण

    ज्यावेळी अपघात झाला, त्याच वेळी पोलिसांची गस्त सुरू होती. वीज खांबाला धडक बसल्यामुळे तारा तुटून स्पार्किंग होत होती. पोलीस हवालदार रवींद्र ठाकरे, भिकन सुतके आणि यतीन कुलकर्णी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि लाकडी काठीच्या सहाय्याने विजेच्या तारा बाजूला केल्या, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि वाहनातील ३५ प्रवाशांचे प्राण वाचले.

    Maharashtra TimesJalna Crime: जालन्यात बसस्थानक परिसरातल्या लॉजवर छापा; मालकांचा काळा धंदा उघड, पश्चिम बंगाल ते संभाजीनगर रॅकेट उद्ध्वस्त, 13 महिला…

    जखमींना सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. लग्न समारंभावेळी अशी दुर्घटना घडल्यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा