बीडच्या आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथे सोशल मीडियावरील स्टेटस आणि स्टोरीच्या वादातून २३ वर्षीय दीपक नालकोल या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हाणामारीत अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले असून…
किरकोळ वाद अन् दोन गट भिडले
आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथे सोमवारी दि. १६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता जि.प. शाळेसमोर इंस्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडियावरती ठेवलेल्या स्टेटस व स्टोरीच्या किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन गट भिडले. एका गटातील तरुणाने धारदार शस्त्राने सपासप वार केले.
एकाचा मृत्यू
हाणामारीत दिपक शिवाजी नालकोल वय २३ वर्ष हा तरुण गंभीर जखमी झाला. उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर बाळु खोडके, शशिकांत लांबडे या २ तरुणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना अहिल्यानगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडीयावर स्टेटस व स्टोरी चा राग मनात धरून झालेल्या वादात तरुणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर यामध्ये २ आरोपी सध्या पोलिसाच्या ताब्यात आहेत.
Nanded Crime : अजब चोरी, गजब बनाव! आईकडे लपवले 12 लाख अन् पोलिसांना सांगितलं ‘घरफोडी झाली’; नांदेडमधील महिलेने असं का केलं?
परिस्थिती नियंत्रणात
अधिक तपास आष्टी पोलीस करीत आहेत. घटनेची माहिती कळताच उपविभागीय अधिकारी अधिकारी बाळकृष्ण हानपूडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, विक्रांत हिंगे, पोलिस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे,व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणाचा पुढील तपास आष्टी पोलिस करत आहेत.
