• Sat. Jun 6th, 2026
    Indapur Crime : तरुणीचं आई आणि भावासमोर अपहरण, इंदापुरात अतिशय भयानक आणि डोकं चक्रावणारी घटना

    इंदापुराच्या भिगवण येथे अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवरुन जाणाऱ्या आई, मुलगी आणि तिच्या भावाला दोन आरोपींनी डोळ्यांच मिरची पावडर टाकून थांबलं. त्यानंतर त्यांनी तरुणीचं अपहरण केलं. या धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, पुणे : पुरोगामी ख्याती असलेल्या महाराष्ट्रात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात महिला आणि मुलींच्या विनयभंगाच्या आणि अत्याच्याराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपींच्या विरोधात कठोरात कठोर शिक्षा केली जात असली तरी गुन्हेगारीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. इंदापुरातून तर अतिशय भयानक आणि डोकं चक्रावणारी घटना समोर येत आहे. इंदापुराच्या भिगवण परिसरात आई आणि भावाच्या डोळ्यांसमोर तरुणीचं अपहरण झाल्याचा धक्कादायक आणि सतापनजक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे आरोपींना कायद्याचं भय राहिलेलं नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी या घटनेवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

    “या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. जाहीर हारून शेख आणि आयान हारून शेख या दोन आरोपींनी दुचाकीवरुन जाणाऱ्या आई, मुलगी आणि तिच्या भावाच्या डोळ्यांत लाल चटणी टाकून त्यांना अडवलं. त्यानंतर त्यांनी 21 वर्षीय मुलीचं अपहरण केल्याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी काही टीम रवाना करण्यात आल्या आहेत. विविध टोल नाके आणि रस्त्यावर असलेले नाकाबंदी या दोन्ही माध्यमातून भिगवण पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत”, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली आहे.

    अपहरणाची ही धक्कादायक घटना भिगवण येथील वार्ड नंबर 5 येथे मंगळवारी (17 फेब्रुवारी) दुपारी चारच्या सुमारास घडली. भर दिवसा हा प्रकार घडल्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. आरोपी मुलीचे इतक्या खुलेपणाने अपहरण करुच कसे शकतात? त्यांना पोलिसांचे भय नाही का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

    या घटनेमध्ये अपहरण करण्यात आलेल्या मुलीचे पाच दिवसांवर लग्न येऊन ठेपले होते आरोपी आणि अपहरण करण्यात आलेली मुलगी एकाच वस्तीवर राहत असल्याने अपहरण नेमके कोणत्या हेतूने करण्यात आले हे स्पष्ट होवू शकले नाही. यासाठी भिगवण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर हिंदू राष्ट्र संघटनांकडून उद्या बुधवारी भिगवण बंदची हाक देण्यात आली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा