• Fri. Mar 6th, 2026
    Pune Crime : सोबत बसून दारु प्यायले, स्वयंपाकावरुन जोरदार वाद, संतापात रुममेटला संपवलं; पुणे हादरलं

    Pimpri-Chinchwad Crime : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

    खेड रुममधल्या मित्राची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड : खेड तालुक्यातील नाणेकरवाडी परिसरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दक्षिण चाकण पोलीस स्टेशन यांनी आरोपीला अटक केली आहे. मृत व्यक्तीचं नाव किशोर सुरेश राणे असे असून, आरोपी कपिल जितेंद्र कोसलकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

    स्वंयपाकावरुन जोरदार वाद

    मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून किशोर राणे आणि कपिल कोसलकर हे दोघे योगेश दत्तात्रय नाणेकर यांच्या मालकीच्या भाड्याच्या खोलीत राहत होते. दोघेही मजुरीचे काम करत होते आणि एकत्रच राहत होते. बुधवारी सुट्टीचा दिवस असल्याने त्यांच्यापैकी एक जण घरी होता. त्यादरम्यान त्यांनी एकत्र दारू प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर स्वयंपाक कोणी करायचा यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद हळूहळू चिघळत गेला.
    Maharashtra TimesKolhapur Crime: पुण्याहून महिला बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी कोल्हापूरला गेली, सोबत 28 लाखांचे दागिने; पण आदल्या दिवशी धक्कादायक प्रकार!

    बरगडीत आणि छातीत वार

    वादाच्या भरात संताप अनावर झालेल्या आरोपी कपिल कोसलकर याने स्वयंपाकघरात असलेल्या कांदा कापण्याच्या चाकूने किशोर राणे यांच्या बरगडीत आणि छातीत वार केले. गंभीर जखमी झालेल्या आणि रक्तबंबाळ अवस्थेतील राणे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांदरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच दक्षिण चाकण पोलीस स्टेशन चे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी योगेश दत्तात्रय नाणेकर यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास सुरू आहे.
    Maharashtra TimesPune PMPL Bus: महाशिवरात्रीनिमित्त पीएमपीकडून जादा बसेसची सोय, कोणत्या मार्गे धावणार? असे आहे नियोजन

    अत्यंत किरकोळ कारणावरून घडलेली ही हत्या पुन्हा एकदा समाजासमोर गंभीर प्रश्न निर्माण करते. क्षणिक संताप, मद्यप्राशन आणि वाद यांचा शेवट थेट एका जीवावर बेतला. पोलिसांनी बाहेरगावाहून येणाऱ्या तरुणांना आवाहन केले आहे की, भाड्याने राहताना योग्य ती चौकशी करावी आणि विश्वासार्ह व्यक्तींसोबतच राहावे, जेणेकरून अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांपासून दूर राहता येईल. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा