• Tue. Mar 10th, 2026

    Nashik Accident: नाशिकमध्ये मोठी दुर्घटना; भाजप खासदाराच्या धावत्या रेंज रोव्हर कारला आग, क्षणात झाला कोळसा, नेमकं काय घडलं?

    Nashik Accident: नाशिकमध्ये मोठी दुर्घटना; भाजप खासदाराच्या धावत्या रेंज रोव्हर कारला आग, क्षणात झाला कोळसा, नेमकं काय घडलं?

    Nashik Car Fire: स्थानिक अग्निशामक दलाला दुर्घटनेची माहिती देत पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर अग्निशमन जवानांनी कारला लागलेली आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.

    नाशिकमध्ये मोठी दुर्घटना: भाजप खासदाराच्या धावत्या रेंज रोव्हरला आग(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर खासदाराच्या धावत्या रेंज रोव्हर कारला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने कारचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे खासदारासह कारमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले असून मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या आगीत कोट्यवधी रुपयांची रेंज रोव्हर कार ही पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान येथील भाजप खासदार लुंबाराम चौधरी हे वाशिम येथून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आले होते. ते रेंज रोव्हर कार (क्रमांक एम एच ०१. डी के ९९७५) मधून हे प्रवास करत होते. सदर कार शहापूर येथील चालक अनिल बबन जाधव (वय ४०) हे चालवत होते. कार गोंदे फाटा परिसरातून जात असताना चालकाला अचानक काहीतरी जळाल्याचा उग्र येऊ लागला. काहीतरी अघटित घडत असल्याचे लक्षात येतात चालक अनिल जाधव यांनी तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. कारला आग लागली असल्याचे दिसतात त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता खासदार चौधरी आणि तर सहकाऱ्यांना गाडीतून खाली उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. काही मिनिटातच आगीने रौद्ररुप धारण केले आणि कारचा अक्षरश: कोळसा झाला.

    सदर घटनेची माहिती मिळताच वाढीवरे पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक अग्निशामक दलाला याबाबत पाचारण देखील करण्यात आले होते. अग्निशमन जवानांनी ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले आणि आगीवर नियंत्रण देखील मिळवले. परंतु गाडीचा केवळ सांगाडाच उरला होता. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ही काही काळ विस्कळीत देखील झाली होती.

    दरम्यान, सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.राजस्थानचे खासदार लुंबाराम चौधरी हे या घटनेत थोड्यात बचावले आहे. खासदार चौधरी हे सुखरूप असल्यानंतर माहिती मिळताच त्यांच्या समर्थक आणि परिवारातील सदस्यांनी सुटकेचा विश्वास घेतला आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून, वाढीवऱ्हे पोलीस ठाण्यामार्फत अधिक तपास सुरू आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा