मुंबईकरांसाठी लोकलचा प्रवास खूप महत्त्वाचा आहे, पण लोकलवाहिनीत नेहमी काही ना काही सुधारणा केल्या जातात. त्यासाठी आता एक महत्त्वपूर्ण नाईट ब्लॉक घेण्यात येत आहे…
नेमका बदल काय?
कांजूरमार्ग स्थानकात प्रवाशांच्या सुविधेसाठी ६ मीटर रुंदीच्या चार अजस्र तुळया रोड क्रेनच्या सहाय्याने बसवण्यात येणार आहेत. हे तांत्रिक काम सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी रात्री १.०५ ते पहाटे ४.३५ या वेळेत विशेष ब्लॉक घेण्यात येईल.
रद्द झालेल्या लोकल गाड्या
सीएसएमटी-ठाणे लोकल: रात्री १२.२४ वाजता सुटणारी गाडी रद्द.
ठाणे-सीएसएमटी लोकल: पहाटे ४.०४ वाजता सुटणारी गाडी रद्द.
मार्गात बदल, ‘या’ स्टेशन्सवर थांबा नाही
रात्री १२.१२ वाजता सुटणारी सीएसएमटी-कर्जत लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान ‘डाऊन जलद’ मार्गावर वळवण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, जलद मार्गावर स्वतंत्र फलाट उपलब्ध नसल्याने ही गाडी विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर या स्थानकांवर थांबणार नाही. या स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी वेळेचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर यांनी पळ काढलाय! हाणामारी कुठे आणि का झाली? संजय राऊतांनी VIDEO दाखवला
प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
मध्य रेल्वेने प्रवाशांना विनंती केली आहे की, प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेचे अधिकृत वेळापत्रक आणि सोशल मीडियावरील अपडेट्स तपासून पाहावेत. कांजूरमार्ग येथील वाढती गर्दी आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता हा नवीन पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, विकासाच्या कामासाठी तात्पुरती गैरसोय होत असली तरी, भविष्यात हा पूल प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित करेल, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Saket Creek Bridge: मुंबई-नाशिक महामार्गावरील खाडी पूल सज्ज, ठाण्यातील कोंडीसाठी लवकरच 4 नवे उड्डाणपूल; कुठून-कुठे जोडणार?
त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नोकरदारांनी आणि प्रवाशांनी वरील बदल लक्षात घेऊनच घराबाहेर पडावे, जेणेकरून स्थानकावर गेल्यावर आपली तारांबळ उडणार नाही.
