• Tue. Jun 16th, 2026
    ZP Election Result: फडणवीसांच्या पठ्ठ्याने विरोधकांचा उडवला धुव्वा; राजेंद्र राऊतांचा बार्शीत चमत्कार, किती जागा जिंकल्या?

    Rajendra Raut: भाजच्या विरोधात बार्शी तालुक्यात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी असे एकूण 4 पक्ष एकत्र येऊन त्यांनी महाआघाडी स्थापन केली होती.

    फडणवीसांच्या पठ्ठ्याने विरोधकांचा उडवला धु्व्वा; राजेंद्र राऊतांचा बार्शीत चमत्कार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सोलापूर: बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना एकत्र आल्या होत्या. दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना एकत्रित येऊन महाआघाडीची स्थापना केली होती. महाआघाडी स्थापन करण्यामागे ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनी पुढाकार घेतला होता. बार्शीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत आणि विद्यमान आमदार दिलीप सोपल अशी मुख्य लढत दिसून आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्र राऊत यांना पाठबळ देत भाजपला स्वबळावर लढण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसंच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महाआघाडीविरोधात जोरदार प्रचार केला होता. या पार्श्वभूमीवर राजेंद्र राऊत यांनी विरोधकांचा धुव्वा उडवत बार्शीतील 6 जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समितीवर निर्विवाद विजय मिळवला आहे.

    बार्शी तालुक्यात एकूण सहा जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडूण आणण्याची जबाबदारी होती. या निवडणुकीत दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीवर भारी पडत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.

    बार्शीत भाजपविरोधात महाआघाडी
    संपूर्ण राज्याचं बार्शीच्या निकालाकडे लक्ष लागले होतं. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय बार्शीचे भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना शह देण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याने सोलापूर जिल्ह्यात मोठी चर्चा होती.

    भाजपचे विजयी उमेदवार –
    जिल्हा परिषद गटातील विजयी उमेदवार
    उपळाई ठोंगे- दीपक वैद्य
    पांगरी गट -रेश्मा डोके
    उपळे दुमाला-भारती दराडे
    पानगाव- नंदकुमार काळे
    मालवंडी सुजाता डोईफोडे
    शेळगाव (आर) बोधले सोनाली महेश

    पंचायत समिती गणातील विजयी उमेदवार
    उपळाई ठोंगे- मीनाक्षी रोंगे
    आगळगाव-सुरेखा मुंढे
    पांगरी – शरद बसवंत
    कारी- किरण घुले
    उपळे दुमाला-ऐश्वर्या महानवर
    गौडगाव- संजय भड
    बावी- राजेंद्र सुरवसे
    पानगाव- भीमा गव्हाणे
    मालवंडी गण -विमल काटे
    सासुरे गण- संतोष निंबाळकर
    मानेगाव गण-जाधव जयमाला भाऊसाहेब
    शेळगाव (आर) साबळे सविता विश्वनाथ

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा