महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. अभिजीत लोढा यांनी दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला शरद पवार यांच्यावर बारामतीत उपचार करण्यात आले. यानंतर डॉक्टांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांना आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं. इथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी शरद पवार यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर डॉ. अभिजीत लोढा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
“शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या छातीमध्ये थोडा कफ झाला आहे. त्यांना व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनची गरज नाही. त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. पुढील दोन-तीन तासांमध्ये रिपोर्ट येतील. त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल”, असे डॉ. अभिजीत लोढा यांनी सांगितले. “शरद पवार यांच्या शरीरातील ऑक्सिजन आणि हृदयाचे ठोके स्थिर आहेत. गेल्या काही दिवसात झालेल्या धावपळीमुळे आणि तणावामुळे थकवा आला आहे”, असे देखील डॉक्टरांनी सांगितले.
डॉ. अभिजीत लोढा नेमकं काय म्हणाले?
“थोडसं फिजिकल इक्सजर्शन झाल्यामुळे छातीत कफ झाला आहे. छातीत थोडं कन्झेशन आहे. आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवल्या आहेत. ट्रीटमेंट चालू आहे. आता प्रकृती एकदम स्थिर आहे. तपासण्यांचा अहवाल आल्यावर आम्हाला उपचारात काही बदल करायचे असतील तर करु. तपासणीचे रिपोर्ट आल्यावर आम्ही काही सांगू शकत नाही. शरद पवार आता रुममध्ये आहेत. आयसीयूत नाहीत’, असंही डॉ. अभिजीत लोढा यांनी स्पष्ट केलं.
रोहित पवार यांची कार्यकर्त्यांना विनंती
आमदार रोहित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना महत्त्वाची विनंती केली. “मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो. आपण अजितबात हॉस्पिटलला येऊ नका. कारण हॉस्पिटलमध्ये इतरही सर्व पेशंट आहेत. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, शरद पवार यांची तब्येत नॉर्मल आहे. आयसीयूत दाखल नाहीयत. एका प्रायव्हेट रुममध्ये आहेत. आताच मी त्यांच्यासोबत चर्चा करुन आलेलो आहे. त्यामुळे घाबरण्यासारखं किंवा टेन्शन घेण्यासारखं काहीही नाही”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा