• Sun. Sep 20th, 2026

Sangli ZP Result : सांगलीत भाजपच्या हातून सत्ता जवळपास निसटली, मविआला सर्वात मोठं यश, वाचा A टू Z निकाल

Sangli ZP Result : सांगलीत भाजपच्या हातून सत्ता जवळपास निसटली, मविआला सर्वात मोठं यश, वाचा A टू Z निकाल

सांगली : सांगली जिल्हा परिषदेत जवळपास सत्ता परिवर्तन झालेलं बघायला मिळत आहे. भाजपप्रणित महायुतीला सत्तेपासून रोखण्यात महाविकास आघाडीला यश मिळालेलं आहे. जिल्हा परिषदेमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळू शकले नसले तरी महाविकास आघाडी ही सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा सांगली जिल्हा परिषदेतला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 61 पैकी 18 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपा हा 16 जागांवर विजय मिळवत नंबर दोनचा पक्ष ठरला आहे.

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला 11 जागांवर विजय मिळाला आहे. जिल्हा परिषदेतील सत्ता भाजपच्या हातातून जवळपास निसटली आहे. 31 ही सत्तेची मॅजिक फिगर असून राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार आणि काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मिळून 30 जागा निवडून आल्या आहेत. या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सांगली जिल्हा परिषद गट 61 पैकी 61 जागांचे निकाल

  • भाजपा – 16
  • राष्ट्रवादी अजित पवार – 06
  • शिंदेसेना – 07
  • काँग्रेस – 11
  • राष्ट्रवादी शरद पवार – 18
  • शिवसेना ठाकरे पक्ष – 01
  • रयत क्रांती संघटना – 01
  • जनसुराज्य शक्ती पक्ष – 01

सांगली जिल्ह्यातील दहा पंचायत समितीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?

  • 10 पंचायत समिती साठी – 122 गण
  • भाजप – 34
  • राष्ट्रवादी अजित पवार – 19
  • राष्ट्रवादी शरद पवार – 28
  • शिवसेना शिंदे – 19
  • काँग्रेस – 21
  • शिवसेना ठाकरे – 00
  • अपक्ष – 1 (शरद पवारांची राष्ट्रवादी पुरस्कृत)

सांगली जिल्हा पंचायत समितीवर सत्ता

  • 1) वाळवा – राष्ट्रवादी शरद पवार
  • 2 ) शिराळा – दोन्ही राष्ट्रवादी एकत्र सत्ता
  • 3) तासगाव – राष्ट्रवादी अजित पवार घड्याळ
  • 4 ) कवठेमहांकाळ – राष्ट्रवादी शरद पवार गट
  • 5) जत – भाजप
  • 6) आटपाडी – शिवसेना
  • 7) मिरज – भाजप
  • 8) खानापूर- शिवसेना शिंदे
  • 9) कडेगाव – काँग्रेस
  • 10) पलुस – काँग्रेस

सांगली जिल्हा 10 पंचायत समिती

भाजप – 2
काँग्रेस – 2
राष्ट्रवादी अजित पवार -1
राष्ट्रवादी श.प – 2
शिवसेना शिंदे -2
दोन्ही राष्ट्रवादी आघाडी – 1
(शिराळा येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र सत्ता स्थापन करणार )

सांगली जिल्हा परिषद तालुका निहाय निकाल

जत तालुका 9 जिल्हा परिषद गट पैकी 8 जागा भाजपा
जत तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गटावर भाजपाची बाजी
भाजप – 08
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 01

वाळवा जिल्हा परिषद 11 पैकी 7 गट राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

  • राष्ट्रवादी शरद पवार 07
  • शिवसेना ठाकरे पक्ष 01
  • भाजपा 01
  • रयत क्रांती 01
  • शिंदे सेना – 01

तासगाव जिल्हा परिषद 6 पैकी तिन्ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे

  • राष्ट्रवादी शरद पवार – 04
  • भाजपा – 00
  • राष्ट्रवादी अजित पवार – 01
  • काँग्रेस – 01

आटपाडी जिल्हा परिषद जागा

  • भाजपा – 01
  • राष्ट्रवादी अजित पवार – 01
  • शिंदेसेना – 02

खानापूर तालुका जिल्हा परिषद गट 4 पैकी चारही जागा शिंदेसेनेला

  • शिवसेना शिंदे – 04
  • भाजपा – 00

शिराळा जिल्हा परिषद 4 गट

  • जनसुराज्य शक्ती पक्ष 01
  • राष्ट्रवादी शरद पवार 02
  • राष्ट्रवादी अजित पवार – 01

कडेगाव जिल्हा परिषद 4 गट

  • काँग्रेस – 04
  • भाजपा – 00

पलूस जिल्हा परिषद 04 गट

  • काँग्रेस – 04
  • भाजप – 00

कवठेमहांकाळ जिल्हा परिषद गट 04

  • राष्ट्रवादी शरद पवार 03
  • राष्ट्रवादी अजित पवार 01

मिरज जिल्हा परिषद

  • भाजप 06
  • काँग्रेस 02
  • राष्ट्रवादी शरद पवार – 02
  • राष्ट्रवादी अजित पवार 01

सांगली जिल्हा 10 पंचायत समिती फायनल निकाल खालील प्रमाणे:

1) सांगली – मिरज पंचायत समिती – फायनल निकाल
22/22 गण
भाजपा – 10
राष्ट्रवादी अजित पवार – 03
शिवसेना शिंदे – 02
काँग्रेस – 03
राष्ट्रवादी शरद पवार – 04
शिवसेना ठाकरे गट – 00

2)सांगली – वाळवा पंचायत समिती – फायनल निकाल
22/22 गण
भाजपा – 04
राष्ट्रवादी अजित पवार – 00
शिवसेना शिंदे – 04
काँग्रेस – 00
राष्ट्रवादी शरद पवार – 14
शिवसेना ठाकरे गट – 00

3)सांगली – जत पंचायत समिती फायनल निकाल
18/18 गण
भाजपा – 12
राष्ट्रवादी अजित पवार – 02
शिवसेना शिंदे – 00.
काँग्रेस – 04
राष्ट्रवादी शरद पवार – 00
शिवसेना ठाकरे गट – 00

4)सांगली -शिराळा पंचायत समिती – फायनल निकाल
08/08 गण
भाजपा – 02
राष्ट्रवादी अजित पवार – 03
शिवसेना शिंदे – 00
काँग्रेस – 00
राष्ट्रवादी शरद पवार – 02
शिवसेना ठाकरे गट – 00
अपक्ष – 01 ( राष्ट्रवादी शरद पवार गट पुरस्कृत)

5)सांगली – कडेगाव पंचायत समिती – फायनल निकाल
08/08 गण

भाजपा – 01
राष्ट्रवादी अजित पवार – 00
शिवसेना शिंदे – 00
काँग्रेस – 07
राष्ट्रवादी शरद पवार – 00
शिवसेना ठाकरे गट – 00

6)सांगली – तासगाव पंचायत समिती – फायनल निकाल
12/12 गण

भाजपा – 01
राष्ट्रवादी अजित पवार – 08
शिवसेना शिंदे – 00
काँग्रेस – 00
राष्ट्रवादी शरद पवार – 03
शिवसेना ठाकरे गट – 00

7) सांगली – खानापूर पंचायत समिती – फायनल निकाल
08/08 गण

भाजपा – 00
राष्ट्रवादी अजित पवार – 00
शिवसेना शिंदे – 08
काँग्रेस – 00
राष्ट्रवादी शरद पवार – 00
शिवसेना ठाकरे गट – 00

8)सांगली – कवठेमहांकाळ पंचायत समिती – फायनल निकाल
08/08 गण

भाजपा – 00
राष्ट्रवादी अजित पवार – 03
शिवसेना शिंदे – 00
काँग्रेस – 00
राष्ट्रवादी शरद पवार – 05
शिवसेना ठाकरे गट – 00

9)सांगली – आटपाडी पंचायत समिती – फायनल निकाल
08/08 गण

भाजपा – 03
राष्ट्रवादी अजित पवार – 00
शिवसेना शिंदे – 05
काँग्रेस – 00
राष्ट्रवादी शरद पवार – 00
शिवसेना ठाकरे गट – 00

10) सांगली – पलूस पंचायत समिती – फायनल निकाल
08/08 गण

भाजपा – 01
राष्ट्रवादी अजित पवार – 00
शिवसेना शिंदे – 00
काँग्रेस – 07
राष्ट्रवादी शरद पवार – 00
शिवसेना ठाकरे गट – 00

लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed