भाजपचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, मात्र सिद्धाराम म्हेत्रे यांनी त्यांना धक्का दिला आहे.
भाजपचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी देखील भाजप उमेदवारांना निवडुन आणण्यासाठी सर्व शक्ती लावली होती. पण सचिन कल्याणशेट्टी यांची ताकद कुठेतरी कमी पडली आहे.
सलगर गटात भाजप विरोधात नाराजीचा फायदा शिंदें सेनेने घेतला
सलगर जिल्हा परिषद गट हा ओबीसी साठी राखीव होता.सिद्धाराम म्हेत्रे हे लिंगायत समाजातील ओबीसी कोट्यात येतात.शिवराज म्हेत्रे यांनी शिवसेना शिंदें पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला होता.भाजपकडून सिद्धराम बाके हे शिवराज म्हेत्रेच्या विरोधात आवाहन उभे केले होते.
Mawal ZP Election Result : ‘दादांची उणीव भासतेय…’; मावळच्या ‘क्लीन स्वीप’नंतर आमदार सुनील शेळके भावुक, विरोधकांवर प्रहार
सलगर जिप मतदारसंघात याचाच फायदा शिंदेंसेनेचे उमेदवार शिवराज याना झाला.भाजप विरोधात लाट निर्माण करण्यात सिद्धराम म्हेत्रे आणि शिवराज म्हेत्रे यांना यश आले आहे.जवळपास तीन हजारांच्या फरकाने शिवराज म्हेत्रे यांचा विजय झाला आहे.
तोळणूर पंचायत समितीत शिंदें सेनेच्या शीतल म्हेत्रेचा 1100 मतांच्या फरकाने विजय
अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर पंचायत समितीत जवळपास 11 गाव आहेत.माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचं राजकीय प्रवास 1992 साली याच पंचायत समितीतुन झालं होतं.त्याच तोळणूर पंचायत समितीच्या गणातून सिद्धराम म्हेत्रे यांनी मुलगी शीतल म्हेत्रेना मैदानात उतरविले होते.
भाजपकडून सविता सोलंनकर यांनी शीतल म्हेत्रेसमोर कडवे आवाहन उभे केले होते. मात्र मतदारांनी तोळणूर गण आणि सलगर जिल्हा परिषद गटात शिवसेनेला अधिक पसंती दिली आहे.