• Tue. Sep 22nd, 2026
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींचा आज निकाल

Raigad ZP Election Results Live : अलिबागमध्ये भाजप–शेकापला धक्का

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत अलिबाग तालुक्यात मतदारांनी जुने राजकीय किल्ले उद्ध्वस्त करत भाजप व शेतकरी कामगार पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. शहापूर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित नाईक यांनी ८,९०८ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजपचे माजी आमदार सुभाष पाटील यांचे पुत्र सवाई पाटील, शिवसेना शिंदे गटाचे गिरीश पाटील व शेकाप उमेदवारांचा पराभव केला. दरम्यान, आंबेपूर गटात शिवसेना शिंदे गटाच्या रसिका केणी यांनी भाजपच्या चित्रा पाटील यांचा ४,५१५ मतांनी पराभव केला. या निकालांमुळे अलिबाग तालुक्यात पेझारी संस्थानाच्या प्रभावाला निर्णायक धक्का बसल्याची चर्चा असून, स्थानिक राजकारणात मोठा बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed