रायगडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला असला तरी बहुमतासाठी आवश्यक असलेला ‘जादुई आकडा’ गाठण्यासाठी त्यांना अन्य पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच “मोठा गट शिंदेंचा, सत्ता मात्र अनिश्चित” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आले, तर त्यांची एकत्रित संख्या ३१ वर पोहोचते, जी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे भाजप–राष्ट्रवादी युतीची शक्यता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे. अशी युती प्रत्यक्षात आल्यास सर्वाधिक सदस्य असलेला शिंदे गट विरोधी बाकावर बसण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच जिल्ह्यातील राजकारण अधिकच रंगतदार झाले आहे.
दरम्यान, मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेने जिल्ह्यात केलेल्या विकासकामांचा, जनसंपर्काचा आणि संघटनबळाचा दाखला देत आपण नैसर्गिकरित्या सत्तेचे दावेदार असल्याचा ठाम दावा केला आहे. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी निकालानंतर प्रतिक्रिया देताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “जिल्ह्यात आमचे सदस्य मोठ्या प्रमाणात निवडून आले असून याबाबतची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आहे. जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती, संख्याबळ आणि जनतेचा कौल लक्षात घेऊन योग्य तो निर्णय तेच घेतील.”
विजयी उमेदवारांची नावे
शहापूर गट
उमेदवार/पक्ष/चिन्ह
अमित अशोक नाईक/राष्ट्रवादी/घड्याळ
आंबेपूर गट
रसिका केणी/शिवसेना/धनुष्यबाण
आवास गट
दिलीप भोईर/शिवसेना/धनुष्यबाण
थळ गट
मानसी दळवी/शिवसेना/धनुष्यबाण
चेंढरे गट
अदिती नाईक दळवी/शिवसेना/धनुष्यबाण
चौल गट
सचिन राऊळ/शिवसेना/धनुष्यबाण
कवीर गट
अनंत गोंधळी/शिवसेना/धनुष्यबाण
नवघर गट
प्रेरणा पाटील /शिवसेना उबाठा/मशाल
जासई गट
डॉ मनीष पाटील /काँग्रेस / हात
चाणजे गट
रीना जितेंद्र घरत (भाजप)
चिरनेर गट
डॉ अविनाश ठाकूर/काँग्रेस/हात
कळंब गट
नारायण डामसे/राष्ट्रवादी/घड्याळ
वरेडी गट
राधिका ठाकरे/भाजप/कमळ
नेरळ गट
सुनीता टोकरे/शिवसेना/धनुष्यबाण
मोठे वेणगाव गट
उषा ठोंबरे राष्ट्रवादी/घड्याळ
कडाव गट
योगेश कांबेरे
कशेळे गट
वर्षा सुरेश दोरे
तळा गट
गीता जाधव/राष्ट्रवादी काँग्रेस/घड्याळ
रहाटाड गट
नलिनी लोखंडे/राष्ट्रवादी/घड्याळ
वावंजे गट
कमला देशेकर/भाजप/कमळ
नेरे गट
आत्मराम भस्मा/भाजप/कमळ
पालीदेवेंद गट
प्राची जाधव/भाजप/कमळ
पळस्पे गट
हर्षदा घरत/भाजप/कमळ
वावेघर गट
अन्यना गाताडे/भाजप/कमळ
गव्हाण गट
निकिता खारकर/भाजप/कमळ
केळवणे गट
मंगेश वाकडीकर/भाजप/कमळ
जिते गट
ताई दरवडा/भाजप/कमळ
दादर गट
वैकुंठ पाटील/भाजप/कमळ
वडखळ गट
प्रभाकर म्हात्रे/भाजप/कमळ
महालमिर्या डोंगर गट
जनार्दन भस्मा/भाजप)कमळ
शिहू गट
पल्लवी भोईर/शिवसेना उबाठा/मशाल
पोलादपूर गट
निलेश कुंभार/शिवसेना/धनुष्यबाण
लोहारे गट
चंद्रकांत कळंबे/शिवसेना/धनुष्यबाण
महाड बिरवाडी गट
मंदा ढेबे)शिवसेना/धनुष्यबाण
खरवली गट
मनाली कालिजकार/शिवसेना/धनुष्यबाण
नडगाव / बिरवाडी गट
विकास गोगावले/शिवसेना/धनुष्यबाण
दासगाव गट
मन्सूर अब्दुल हलीम ताज)शिवसेना/धनुष्यबाण
करंजाडी गट
निलेश ताठरे/शिवसेना/धनुष्यबाण
निजामपूर गट
अविनाश नलावडे/शिवसेना)धनुष्यबाण
तळाशेत गट
दिशा जाधव/राष्ट्रवादी/घड्याळ
मोर्बा गट
अस्लम राऊत)राष्ट्रवादी/घड्याळ
गोरेगाव गट
दिनेश हरवंडकर/शिवसेना/धनुष्यबाण
कोर्लई गट
ज्योती नागवकर/शिवसेना/धनुष्यबाण
राजपुरी गट
विघ्नेश माळी/शिवसेना/धनुष्यबाण
म्हसळा गट
अनिल बसवत/राष्ट्रवादी/घड्याळ
पांगळोली गट
अभिषेक विचारे/राष्ट्रवादी/घड्याळ
नागोठणे गट
सुमित काते/शिवसेना/धनुष्यबाण
आंबेवाडी गट
निधी जाधव/राष्ट्रवादी/घड्याळ
भुवनेश्वर गट
मधुकर पाटील/राष्ट्रवादी/घड्याळ
घोसाळे गट
उर्वशी वाडकर/शिवसेना/धनुष्यबाण
श्रीवर्धन गट
वासंती गुणाजी/राष्ट्रवादी/घड्याळ
आराठी गट
वैभवी कोमनाक/राष्ट्रवादी/घड्याळ
जांभुळपाडा गट
शर्मिला बोडके/शिवसेना)धनुष्यबाण
राबगाव गट
चंद्रकांत वारगुडा/भाजप)कमळ
चौक गट
वैशाली खैर/शिवसेना उबाठा/मशाल
वासंबे गट
नेहा परांगे/भाजप/कमळ
सावरोली गट
संतोष बैलमारे/राष्ट्रवादी/घड्याळ
आत्करगाव गट
रेश्मा पाटील/शिवसेना/धनुष्यबाण