Sunil Sadarangani Death : आत्महत्या करण्यापूर्वी सतराव्या मजल्याच्या टोकावरुन हात जोडत काहीतरी पुटपुटतानाचा सुनील सदारंगानी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे
सुनील सदारंगानी चार-पाच दिवसांपूर्वी पत्नीसोबत पुण्यावरुन सोलापुरात आले होते. त्यांना दोन मुलगे असून, एक मुलगा अमेरिकेत व दुसरा पुण्यात व्यवसाय करतो. नातेवाइकांच्या फिर्यादीनंतर सदारंगानी यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.
‘पनाश’ अपार्टमेंटच का?
विजयपूर रस्त्यावरील पनाश अपार्टमेंटचे दहा मजले पूर्ण झाले असून, सात मजले अर्धवट स्थितीत आहेत. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सदारंगानी यांनी गाडी पनाश अपार्टमेंटच्या उघड्या गेटमधून आत नेली. ते शेवटच्या मजल्यावर चढले आणि आत्महत्या केली. यासाठी त्यांनी ‘पनाश’ अपार्टमेंटच का निवडले, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र या इमारतीचे बांधकाम अर्धवट असल्यामुळे तिथे कोणाची वर्दळ नसेल आणि सीसीटीव्ही नसतील, या विचाराने ते तिथे गेल्याचा अंदाज आहे.
Mumbai Crime : तरुण-तरुणीत संमतीने शरीरसंबंध वाटतात, अत्याचाराचा गुन्हा होत नाही; मुंबईतील कोर्टाचं निरीक्षण, तिने हॉटेलचं नाव…
गाडीच्या नंबरवरून ओळख पटली
आत्महत्येची घटना कळताच विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. त्या वेळी सदारंगानी यांची चारचाकी तेथे उभी होती. गाडीच्या नंबरवरून सदारंगानी यांच्या नातेवाइकांशी पोलिसांनी संपर्क साधला. पोलिसांनी मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठविला. त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Delhi Biker Death : आई गरम चपात्या वाढायला घे; कुटुंब वाट पाहत राहिलं, तो रात्रभर आलाच नाही, लग्नाच्या वाढदिवशी आईवर लेकाची बॉडी पाहण्याची वेळ
व्हिडिओ व्हायरल
सदारंगानी पनाश अपार्टमेंटच्या छतावर चढले. काही क्षण हात जोडून विचार केला. तेथेच आडवे झापले आणि दीड-दोन मिनिटांनी झोपलेल्या स्थितीतच १७ व्या मजल्यावरून ते स्वत: खाली कलंडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
