Oil Smuggling Racket Busted: भारतीय तटरक्ष दलाने एक मोठी कारवाई केली आहे. मुंबईजवळ समुद्रात एका अंतराराष्ट्रीय तेल तस्करी करणाऱ्या गँगचा छडा लावून त्यांच्यार कारवाई केली आहे.
कसा लावला छडा?
5 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईपासून सुमारे 100 सागरी मैल पश्चिमेस कोस्ट गार्डच्या जहाजांनी तीन संशयित जहाजांना अडवले. जहाजांवरील इलेक्ट्रॉनिक माहितीची पडताळणी, कागदपत्रांची छाननी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर कोस्ट गार्डच्या विशेष पथकाने या गुन्हेगारी साखळीचा आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा उलगडा केला.
Cyber Fraud: तुमच्या अकाऊंटमधून पैसे कट झाल्यास मिळणार २५ हजार रुपये; रिझर्व्ह बँक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भारतीय विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका मोटर टँकरची माहिती कोस्ट गार्डच्या दलाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे मिळाले . त्यानंतर डिजिटल तपासणी करताना त्या टँकरकडे येणाऱ्या इतर जहाजांच्या हालचालींचा डेटा ही तपासण्यात आला. यात आणखी दोन जहाजे समुद्रात तेलाधारित माल बेकायदेशीरपणे विकत असल्याचं समोर आलं.
कारवाई काय होणार?
5 फेब्रुवारी रोजी कोस्ट गार्डच्या विशेष पथकांनी जहाजांवर चढाई करून डिजिटल पुराव्यांची पुष्टी केली आणि जहाजे ताब्यात घेतली. पुढील तपासासाठी ही जहाजे मुंबईकडे आणली जाण्याची शक्यता असून त्यानंतर ती भारतीय सीमाशुल्क व कायदा अंमलबजावणी यंत्रणांच्या (Indian Customs and Law enforcement) ताब्यात देण्यात येतील. प्राथमिक चौकशीत या जहाजांनी कायद्यापासून बचाव करण्यासाठी वारंवार आपली ओळख बदलल्याचं समोर आलं आहे. जहाजमालक परदेशात असल्याचीही माहिती मिळाली आहे.
Mumbai Airport: आता एअरपोर्टवर होणार झटपट ‘चेक-इन’, मुंबई विमानतळावर नव्या सुविधा; कसं-काय बदलणार?
भारतीय तटरक्षक दलाच्या या कारवाईमधून पुन्हा एकदा समुद्री सुरक्षेतील भारताची भूमिका अधिक स्पष्ट झाली आहे. एका साध्या डिजिटल पडताळणीपासून या गुन्ह्याचा छडा लागला. त्यानंतर तटरक्षक दलाच्या पथकाने चौकशी आणि कारवाई करून यांचा भांडाफोड केला.
