• Sun. Jun 7th, 2026

    Pune Crime: 13 दुचाकींसह सराईत चोरटा जेरबंद; चोरी करण्याची पद्धत पाहून बसेल धक्का! फक्त 30 सेकंदात….

    Pune Crime: 13 दुचाकींसह सराईत चोरटा जेरबंद; चोरी करण्याची पद्धत पाहून बसेल धक्का! फक्त 30 सेकंदात….

    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड: अवघ्या 30 सेकंदांत दुचाकीचे लॉक तोडून गाडी चोरून पसार होणाऱ्या सराईत चोरट्याला पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात त्याच्या साथीदारालाही पोलिसांनी अटक केली असून आरोपींकडून साडेपाच लाख रुपये किमतीच्या 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

    अहिल्यानगर जिल्ह्यातील निलेश राजू मंडलिक आणि त्याचा साथीदार संदीप सोनवणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून चाकण एमआयडीसी हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याप्रकरणी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्या पथकाकडून सुरू होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

    तपासादरम्यान निलेश मंडलिक हा चाकण येथील आंबेठाण चौक परिसरात राहत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी शुभम खंडागळे यांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत निलेश मंडलिक याला ताब्यात घेतले.

    Indian Coast Guard: मुंबईजवळ भरसमुद्रात थरार! तटरक्षक दल ऍक्शन मोडमध्ये; 3 मोठी जहाजं पकडली, कारवाईनं खळबळ

    पोलिसी चौकशीत निलेश मंडलिक याने औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तो अत्यंत शार्प चोर असून अवघ्या 30 सेकंदांत दुचाकीचे लॉक तोडून गाडी चोरत असल्याचे तपासात उघड झाले. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एक प्रात्यक्षिक व्हिडिओही तयार केला आहे.

    दरम्यान, चोरी केलेल्या दुचाकी आरोपी संदीप सोनवणे हा मिळेल त्या किमतीत विकत होता आणि मिळालेल्या पैशांची आपापसात वाटणी केली जात होती. अखेर दोन्ही आरोपी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

    आरोपींकडून ५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १३ दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिली आहे. नागरिकांनी आपली दुचाकी सुरक्षित ठिकाणी तसेच घराच्या पार्किंगमध्येच उभी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed