मुंबई महापालिका निवडणुकीनंतर भाजपने नगरसेविका रितू तावडे यांना महापौर पदाची उमेदवारी दिली आहे. पण महापौर पदाच्या शर्यतीत भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका अलका केरकर या देखील होत्या. त्या तीनवेळा निवडणूक जिंकल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठं यश मिळालं आहे. भाजपने 89 जागांवर यश मिळवलं आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्या युतीला मुंबईकरांनी घवघवीत मतदान केलं आहे. त्यामुळे शिवसेना भाजपच्या महायुतीने बहुमताचा आकडा मिळवला आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर महापौर पद कुणाकडे जाईल? याबाबत सस्पेन्स होता. निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलं होतं. त्यामुळे शिंदेंचा महापौर पदावर दावा असल्याच्या चर्चांना उधाण आलं. पण भाजप महापौर पद सोडायला तयार नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे भाजपचा महापौर मुंबई महापालिकेत बसणार असल्याचं स्पष्ट झालं.
मुंबईच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत होण्यापूर्वी कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण सुटेल? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर महिला खुला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत निघाली. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील महिला नगरसेविका महापौर पदावर विराजमान होणार असल्याचं स्पष्ट झालं. महापौर पदाच्या आरक्षण सोडत नंतर भाजपमधील अनेक महिला नगरसेवकांची नावे चर्चेत आले. यामध्ये शितल गंभीर, रितू तावडे, राजश्री शिरवाडकर यांच्या नावांची जास्त चर्चा आहे. या तीनपैकी एक महिला नगरसेविका महापौर होईल, अशी चर्चा आहे. ही चर्चा खरी ठरली.
भाजपने रितू तावडे यांना महापौर पदाची उमेदवारी जाहीर केली. पण भाजप आपल्या धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहे. भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केला असता तर भाजप ज्येष्ठ नगरसेविका अलका केरकर यांच्या गळ्यात देखील महापौर पदाची माळ टाकू शकते अशी चर्चा झाली. अलका केरकर या नेमक्या कोण आहेत? या विषयी सविस्तर जाणून घेऊयात.
अलका केरकर या भाजपच्या अतिशय अनुभवी नगरसेविका आहेत. त्या सलग 3 वेळा मुंबई महापालिका निवडणुकीत जिंकून आल्या आहेत. 2012 पासून त्या मुंबई महापालिकेत कार्यरत आहेत. विशेष म्हणजे 2014 ते 2015 या काळात त्या मुंबई महापालिकेच्या उपमहापौर देखील होत्या. त्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेत प्रशासकीय कामकाजांचा प्रदीर्घ अनुभव आहे. अलका या वांद्रे पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 98 चे प्रतिनिधित्व करतात. मुंबई महापालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत त्या महापौर पदाच्या प्रबळ दावेदार होत्या. त्यांच्यासह अनेक महिला नगरसेवक यासाठी शर्यतीत होत्या. अखेर रितू तावडे यांना पक्षाकडून महापौर पदाची उमेदवारी मिळाल्याने त्यांना ही मोठी संधी मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा