४२.६६ लाखांना गंडा
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगून बिबवेवाडी येथील व्यक्तीची ४२ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी ४७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदारांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून लिंक पाठवली. सुरुवातीला अल्प रक्कम परत देऊन त्यांचा विश्वास संपादन केल्यावर विविध कारणे सांगून आरोपींनी मूळ गुंतवणूक व नफ्याची रक्कम परत न करता ४२ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. हा प्रकार १६ नोव्हेंबर २०२५ ते चार फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडला.
‘यूपीआय’द्वारे लूट
शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी यूपीआय, ‘आरटीजीएस’द्वारे पैसे घेऊन एका तरुणाची साडेसव्वीस लाखाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी केसनंद येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाने वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदारांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून शेअर ट्रेडिंगबाबत सातत्याने मेसेज पाठवले जात होते. अधिक नफ्याचे आमिष दाखवून यूपीआय व आरटीजीएसद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदारांनी २६ लाख ५५ हजार रुपये पाठवले. मात्र, कोणताही परतावा न देता आर्थिक फसवणूक करण्यात आली.
तपास सुरू; नागरिकांना दक्षतेचे आवाहन
तिन्ही प्रकरणांत पोलिसांकडून बँक खाते, मोबाइल क्रमांक, डिजिटल लिंक आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. अनोळखी व्हॉट्सअॅप ग्रुप, संशयास्पद लिंक किंवा अॅपच्या माध्यमातून गुंतवणूक करताना नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे