• Mon. Jun 15th, 2026

    मुले पळविण्याचा संशय, जमावाच्या मारहाणीत 30 वर्षीय तरुणाचा अंत

    मुले पळविण्याचा संशय, जमावाच्या मारहाणीत 30 वर्षीय तरुणाचा अंत

     जळगाव

    मूल पळवून नेत असल्याच्या संशयावरून आव्हाणे शिवारात ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत पाच जणांना ताब्यात घेतले.

    काय घडलं?
    जळगाव ते कानळदा रोडवरील अव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंग परिसरात सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास एक अनोळखी तरुण संशयास्पदरित्या वावरत होता. तेथील एका मुलाला उचलून घेऊन जात असल्याचा संशय उपस्थितांना आला. बघता बघता मोठी गर्दी जमली. जमावाने पोलिसांना कळवण्याऐवजी त्याला लाथा-बुक्क्यांनी आणि मिळेल त्या वस्तूने मारहाण करण्यास सुरुवात केली.

    सरपंच पिंटू पाटील यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असता, त्यांना तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. पोलिसांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला आणि शरीराच्या अंतर्गत भागाला मार लागला होता. मंगळवारी (दि. २४) पहाटे ४:३० वाजता उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. कोणतीही शहानिशा न करता जमावाने केलेलं हे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारं आहे.पोलिसांनी मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा, ता. जळगाव), अजय डोंगर कोळी (रा. थोरगव्हाण, ता. यावल), प्रशांत उर्फ प्रकाश शशिकांत सोनवणे, अजय ऊर्फ बादल शशिकांत सोनवणे (रा. बामणोद ता. यावल) आणि आफताब आरिफ खाटीक (रा. शनिपेठ, जळगाव) अशा पाच संशयितांना ताब्यात घेतले. पोलिस हवालदार श्रीकांत बदर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांसह इतर अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मृत तरुण हिंदीभाषक असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed