Nashik Malegaon MIDC Fire News: माळेगाव एमआयडीसीत पेपर रोल कंपनीला आग लागून लाखोंचा कच्चामाल खाक झाला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कंपनीच्या आवारात उघड्यावर ठेवलेल्या कच्च्या मालाला आग लागल्याने काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. कागदाच्या साहित्यामुळे आगीच्या ज्वाळा व धुराचे लोळ तब्बल दोन किलोमीटर अंतरावरून दिसत होते. धनश्री पेपर रोल कंपनी ही हिंदुस्तान पेट्रोलियमच्या एलपीजी गॅस बॉटलिंग प्लांटच्या शेजारी असल्याने औद्योगिक वसाहतीत मोठ्या अपघाताची भीती निर्माण झाली होती. माळेगाव अग्निशमन दलासह ‘एमआयडीसी’, सिन्नर नगरपरिषद, नाशिक महापालिका व हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले.
Trimbakeshwar Nagar Parishad: ‘स्वीकृत’साठी तब्बल सव्वा कोटीची बोली! त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत पैशांचा खेळ, सामंजस्याने कमाई?
विविध अग्निशमन दलांच्या बंबांनी सात फेऱ्या करीत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सकाळी सातच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले, तरी दुपारी एक वाजेपर्यंत हवेमुळे ठिकठिकाणी आग पुन्हा पेटत होती. त्यामुळे एमआयडीसी व नगरपरिषदेचे अग्निशमन बंब उशिरापर्यंत घटनास्थळी तैनात ठेवण्यात आले होते. या आगीत जीवितहानी झाली नसल्याची माहिती कंपनीचे मालक भावेश पटेल व व्यवस्थापक राजेंद्र पवार यांनी दिली.
Hemalata Patil : अजित दादांनी 27 तारखेला मला शब्द दिलेला, त्यांचं निधन होताच घाणेरडं राजकारण, NCP नेत्याचा गंभीर आरोप
पांगरीत सव्वा लाखाचा मका, चारा खाक
सिन्नर : तालुक्यातील पांगरी येथे वीजेच्या तारांमध्ये निर्माण झालेल्या घर्षणामुळे पडलेल्या ठिणग्यांमुळे शेतकऱ्याच्या शेतातील मका व चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना सोमवारी (दि.२) दुपारी घडली. या आगीत सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले. पांगरी-धारणगाव रस्त्यावर सोमनाथ निरगुडे यांची वस्ती असून, त्यांनी शेतात मका पीक घेतले होते. पीक काढणीनंतर शेतातील खळ्यात पाच ते सहा ट्रॅक्टर चारा तसेच त्याशेजारी तीन ते चार ट्रॅक्टर मक्याच्या बिट्ट्या साठवून ठेवल्या होत्या. वीजेच्या तारांमध्ये पक्ष्यांमुळे घर्षण होऊन आगीच्या ठिणग्या पडल्या.
