Baramati Plane Crash: बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत राष्ट्रवादीच्या आमदाराकडून गंभीर शंका उपस्थित करण्यात आली आहे.
अमोल मिटकरी यांनी म्हटलंय की, “आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले. त्यातील पहिली खुर्ची ही सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची आणि दुसरी खुर्ची अजितदादांची होती. मृत्यूच्या आदल्या दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे,” असं म्हणत मिटकरी यांनी हे गंभीर प्रश्न विचारले आहेत.
अमोल मिटकरींच्या मनात कोणती शंका? विचारले हे पाच प्रश्न
1. अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?
2. सहावी व्यक्ती कुठे गेली?
3. Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?
4. एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???
5. एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?
दरम्यान, “प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही. मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय आणि प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही,” असंही अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.
