5500 ST Buses for Ashadhi Yatra : यंदाच्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आषाढी यात्रेसाठी ५,५०० एसटी गाड्या चालवल्या जाणार आहेत.
आषाढी एकादशी २०२६ एसटी बसेस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांसह विठ्ठल भक्तांच्या सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५,५०० बसगाड्या चालवण्याचा निर्णय परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. गावातील किमान ४० प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास गावातून थेट पंढरपूरपर्यंत एसटी चालवण्यात येणार आहे. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली राज्य परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत आषाढी यात्रेचा आढावा घेण्यात आला. यंदा आषाढी एकादशी २६ जुलैला आहे. वारीनिमित्त लाखो वारकरी पालख्यांसह पायी, रेल्वेने पंढरपुरात दाखल होतात. गेल्या वर्षी महामंडळाने ५,२०० बसगाड्या चालवून २१ लाख ९५ हजार भाविकांना सुरक्षित प्रवास घडवला होता. भाविकांच्या मागणीनुसार यंदा बसगाड्यांच्या संख्येत ३००ने वाढ करण्यात आली आहे.
चार तात्पुरती बस स्थानके
पंढरपुरातील गर्दी विभागण्यासाठी यंदाही चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. या स्थानकांवर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एकादशीच्या दिवशी एसटीचे ३६हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षारक्षक स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाहतुकीचे नियोजन करणार आहेत. आषाढीसाठीच्या विशेष बस प्रवासात सरकारच्या सर्व प्रवासी सवलती लागू राहणार आहेत.भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी, विठुरायाच्या दर्शनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले आहे. Maharashtra Weather: दोन दिवसांत मुंबई-पुण्यात पावसाची शक्यता, कोणत्या भागांना ‘यलो ॲलर्ट’? येत्या आठवड्यासाठी IMDचा अंदाज जाहीर
29 जूनला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं पंढरीच्या दिशेने प्रस्थान
संत निवृत्तीनाथ महाराज यांची आषाढ वारी पालखी २९ जून रोजी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर दिंडी सोहळ्यासाठी त्र्यंबक ते नाशिकपर्यंतचा रस्ता वारकऱ्यांना उजव्या बाजूने खुला करुन देण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे पालखी मार्ग सुखकर होईल, असा आशावाद वारकरी भाविक व संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. गणपतीपुळ्यात 8 जण खोल पाण्याकडे ओढले गेले, किनाऱ्यावर एकच आक्रोश, छत्रपती संभाजीनगरच्या 5 तरुणांचा करुण अंत
पालखीसाठी उजवी बाजू खुली
त्र्यंबक ते नाशिक पायी पालखी सोहळा मार्ग पाहणी दौरा विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला. हा मार्ग वारकऱ्यांसह इतर वाहनांसाठी गौरसोयीचा ठरत असल्याने निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंखे व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार तहसीलदार गणेश जाधव, पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, मुख्याधिकारी गोविंद जाधव व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गाची पाहणी करुन दिंडी सोहळ्यासाठी मार्गाची उजवी बाजू खुली करण्याचे आश्वासन दिले.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा