Pawanraje Nimbalkar Murder Case Accused Acquitted : धाराशिवमधील काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची ३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
माफीचा साक्षीदार पारसमल जैन आरोपमुक्त
मुख्य आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार व राज्याचे माजी गृह राज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपी निर्दोष आणि माफीचा साक्षीदार पारसमल जैन आरोपमुक्त ठरल्याने हा निकाल धक्कादायक आणि ‘सीबीआय’च्या तपासक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला. सीबीआयसह पीडित राजेनिंबाळकर कुटुंबानेही या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे जाहीर केले.
Omraje Nimbalkar: निकालानंतर ओमराजे उद्धव अन् आदित्य ठाकरेंबद्दल बोलले; जिवलग मित्र मातोश्रीवर, प्लान ठरला
गर्दीने खच्चून भरलेल्या न्यायालयात शनिवारी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांच्याकडून निकालपत्राचे वाचन करण्यात येत असताना, पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर सर्व बारकाईने ऐकत होते. ८५ वर्षीय आजारी आरोपी पद्मसिंह पाटील व्हीलचेअरवर उपस्थित होते. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र व भाजपचे धाराशिवमधील तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे देखील उपस्थित होते. पद्मसिंह पाटील हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सावत्र बंधू आहेत.
दोघांमधील संबंध ताणले गेले
‘सीबीआय’च्या आरोपपत्रानुसार, पवनराजे निंबाळकर व पद्मसिंह पाटील सख्खे चुलतभाऊ होते आणि पद्मसिंह पाटील राज्य सरकारमध्ये मंत्री असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली पवनराजे निंबाळकर यांनी राजकारणात प्रवेश केला. पद्मसिंह पाटील यांच्या पाठबळामुळे विविध सहकारी बँका, साखर कारखान्यांचे संचालकपद, अध्यक्षपद इत्यादी नियुक्त्यांनंतर पवनराजे निंबाळकर यांची राजकीय कारकीर्द फुलली. त्यामुळे सन २००२पर्यंत त्यांच्यातील संबंध सौहार्दपूर्ण होते. मात्र, उस्मानाबाद सहकारी बँकेतील कथित होम ट्रेड घोटाळा, तेरणा सहकारी साखर कारखान्यातील कथित आर्थिक अनियमितता या प्रकरणांत आपल्याला अटक पद्मसिंहांमुळे झाल्याची पवनराजेंची धारणा होती. त्यातून दोघांमधील संबंध ताणले गेले आणि पवनराजेंनी पद्मसिंह यांच्याविरोधात मोर्चे, उपोषण, आंदोलने केली. त्यानंतर पद्मसिंह व त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोपही पवनराजेंनी केला.
Pavanraje Nimbalkar: एक मणी विस्कटल्यानंतर संपूर्ण माळच विस्कटली! पवनराजे निंबाळकर केसमधील आरोपी कसे सुटले? वाचा CBI कोर्टाचा निकाल जशाचा तसा!
त्यातूनच पद्मसिंह यांनी सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांच्या मदतीने पवनराजेंना संपवण्याचा कट रचला आणि सुपारी देऊन त्यांचा खून करवला, असा आरोप होता. मात्र, ‘या हत्येसाठी आधी झालेल्या बैठका, चर्चा व संभाषणे, शस्त्र मिळवण्यासाठी आरोपींचे बिहारमध्ये जाणे, हत्येच्या सुपारीसाठी देण्यात आलेले पैसे इत्यादीच्या बाबतीत पारसमल जैनने वेगवेगळ्या कबुलीजबाबांत विसंगत माहिती दिली. त्याच्या साक्षीला पूरक साक्षीपुरावेही नाहीत,’ असे नमूद करून न्यायाधीशांनी गुन्ह्याच्या घटनाक्रमांची साखळीच पूर्ण होत नसल्याचे निकालात स्पष्ट केले. २००९ मधील या बहुचर्चित प्रकरणात पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, पारसमल जैन, दिनेश तिवारी, महातम चौधरी, कैलाश यादव, ज्ञानेंद्र पांडे, शशिकांत कुलकर्णी हे आरोपी होते.
सीबीआय ठरली कुचकामी
न्यायाधीशांनी निकालपत्र वाचण्यास सुरुवात करतानाच, ‘ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मात्र, न्यायालय केवळ कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय देऊ शकते,’ असे नमूद केले आणि त्यानंतर सीबीआयच्या अपयशाचा पाढाच वाचला. ‘अशा अत्यंत गंभीर प्रकरणात तपास संस्थेने आरोपींचे ना मोबाइल फोन जप्त केले, ना त्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड मिळवले. सरकारी पक्षाचा संपूर्ण भर माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्यावर राहिला. मात्र, त्याचे दोन्ही कबुलीजबाब व साक्ष, यामध्ये इतक्या विसंगती आहेत, की ते पुरावा म्हणून ग्राह्यच धरता येत नाही. त्याच्या साक्षीला आधारभूत असे अन्य साक्षीपुरावेही नाहीत,’ असे निकालात नमूद करून न्यायालयाने सीबीआयच्या कुचकामी तपासावर बोट ठेवले.
Pawanraje Nimbalkar : पवनराजे निंबाळकर प्रकरण; आरोपींनी याआधी किती वर्ष तुरुंगवास भोगलेला?
असे घडले हत्याकांड
काँग्रसचे ज्येष्ठ नेते आणि धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पवनराजे निंबाळकर यांची ३ जून २०२६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. मारेकऱ्यांनी केलेल्या अंदाधुंद निंबाळकर यांचे चालक समद काझी हे देखील जागीच ठार झाले. कळंबोली सर्कलपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर एमआयडीसीमार्गे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर भरदिवसा घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण राज्य हादरले होते.
३ जून २००६ रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पवनराजे निंबाळकर आपल्या कारने मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होते. त्यांची कार मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे संपवून कळंबोली कॉर्नरजवळ आली असता, एका इंडिका कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करुन रस्ता अडवला. काही सेकंदांतच इंडिका कारमधून दोन ते तीन शार्पशूटर खाली उतरले. त्यांनी निंबाळकर यांच्या कारच्या दिशेने धाव घेत अत्यंत जवळून अंदाधुंद गोळीबार केला. कार चालवणारे समद काझी यांनी प्रतिकार, करण्याचा प्रयत्न केला असता, हल्लेखोरांनी त्यांच्यावरही गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले. निंबाळकर आणि त्यांच्या चालकाला जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचे वृत्त पसरताच मुंबई, धाराशिवमध्ये त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती.
Omraje Nimbalkar : पवनराजे केसमधील सर्व आरोपी निर्दोष, ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर, राजकीय निर्णयाबाबत थेट भाष्य
हत्या… तपास आणि खटला
३ जून २००६ : पवन राजेनिंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतील कळंबोली येथे कारमध्ये गोळ्या झाडून हत्या. प्राथमिक तपास कळंबोली पोलिसांकडून.
६ मार्च २००८ : तपास नवी मुंबई पोलिस गुन्हे शाखेकडे वर्ग.
२३ ऑक्टोबर २००८ : राजेनिंबाळकर कुटुंबीयांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश; तपास सीबीआयकडे वर्ग.
६ जून २००९ : हत्येचा कट रचून त्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप ठेवत, सीबीआयकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन खासदार पद्मसिंह पाटील यांना अटक. त्यानंतर आणखी आठ आरोपींना अटक.
Omraje Nimbalkar: मोठा ट्विस्ट! माझा शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय झालेला नाही; ओमराजे माघारी फिरल्यास ५ बंडखोर खासदारांचा गेम होणार!
२० ऑगस्ट २००९ : सीबीआयकडून तपासाअंती न्यायालयात सुमारे पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल. त्यात पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, पारसमल जैन, दिनेश तिवारी, महातम चौधरी ऊर्फ पिंटू चौधरी, कैलाश यादव, ज्ञानेंद्र पांडे ऊर्फ धीरेंद्र पांडे ऊर्फ छोटे पांडे आणि शशिकांत कुलकर्णी यांना आरोपी दाखवले.
१४ मे २०२६ : १२८ साक्षीदारांच्या साक्षी नोंद झाल्यानंतर हे प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले. मात्र, पद्मसिंह पाटील आणि सहआरोपी मोहन शुक्ला हे प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाखाली गैरहजर राहिल्याने न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली.
१६ जून २०२६ : न्यायाधीशांनी निकाल लेखनासाठी अधिक वेळ लागणार असल्याचे सांगत प्रकरण पुन्हा तहकूब केले.
२० जून २०२६ : माफीचा साक्षीदार पारसमलची साक्ष संशयास्पद असल्याचे नमूद करत न्यायालयाने सर्व आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. पारसमलला आरोपमुक्त केले.
Pawanraje Nimabalkar case | पद्ममसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष, पद्मसिंहाचे वकील काय म्हणालेत?
निकालानंतर ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?
‘हे कलियुग आहे. या युगात सद्वर्तनी, सदाचारी लोकांना निराशेच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते; पण सर्वच आरोपी निर्दोष असतील तर पवनराजे यांची हत्या कुणी केली? त्यामुळे या निकालाचे सखोल विश्लेषण करुन उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल’, असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
