• Sun. Sep 20th, 2026
पवनराजे केसमधील सर्व आरोपी निर्दोष, ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर, राजकीय निर्णयाबाबत थेट भाष्य

Pawanraje Nimbalkar Case : कलियुगात वाईटाला जास्त बळ असतं, तर चांगल्याला लवकर यश मिळत नाही. मी माझ्या मतदारसंघात जाऊन पुढील निर्णय घेईन, असं धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे कार चालक समद काझी यांच्या हत्या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी गृहराज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगत विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश सत्यनारायण नवांदर यांनी सबळ पुराव्यांअभावी हा निकाल दिला. या पार्श्वभूमीवर पवनराजे यांचे सुपुत्र आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, असंही त्यांनी सूचित केलं.

ओमराजे निंबाळकर यांची पहिली प्रतिक्रिया

“हा निकाल दुर्दैवी आहे. कारण वीस वर्षांपासून आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी अखंडपणे आम्ही आणि तपास यंत्रणा प्रयत्न करत होत्या. या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. माननीय कोर्टाच्या निकालावर भाष्य करण्यापेक्षा हायकोर्टात अपील करुन त्यांना सगळ्या गोष्टी पटवून देणं, हे महत्त्वाचं आहे” असं खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले. ‘टीव्ही९ मराठी’ वृत्तवाहिनीला ओमराजेंनी प्रतिक्रिया दिली.

ओमराजेंनी राणा पाटलांसोबत बसू नये; तेरमधील कार्यकर्ते मनातलं बोलले

“कोर्टाचा निकाल प्रत्येकाला स्वीकारावाच लागतो. पण हायकोर्टात अपील करु. शेवटच्या रेमेडीपर्यंत प्रयत्न करु. ट्रायल कोर्टातीलच पुरावे समोर येतील, पण कोर्टाने त्याचा काय अर्थ लावला, हे पाहावं लागेल. या प्रकरणाचा पहिल्यांदा तपास मुंबई पोलीस करत होते. त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. पुढे तो तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. त्यांच्यावरही खूप दबाव होता. म्हणून आम्ही २००८ मध्ये उच्च न्यायालयात अपील केलं. त्यांच्या निर्देशानुसार ही केस सीबीआयकडे वर्ग झाली.” असंही ओमराजेंनी सांगितलं.
Maharashtra TimesPawanraje Nimbalkar Case : पवनराजे निंबाळकर प्रकरणात पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, माफीचा साक्षीदार फितुर घोषित

राजकीय निर्णय झालेला नाही

“हे कलियुग आहे. कलियुगात वाईटाला जास्त बळ असतं. चांगल्याला लवकर यश मिळत नाही. मी माझ्या मतदारसंघात जाऊन पुढील निर्णय घेईन. ही केस आणि माझ्या निर्णयाचा (ठाकरेसेनेला सोडून शिंदेसेनेत प्रवेश) काही संबंध नव्हता. मला माझ्या धाराशिव मतदारसंघातील लोकांशी चर्चा करायची आहे, त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत. कारण वीस वर्ष माझे वडील आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणात आम्ही लढा देत होतो. त्यामुळे हा निकाल माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. त्याची वाट मी पाहत होता. माझ्या राजकीय निर्णयाबाबत मी मतदारसंघातील लोकांशी बोलून निर्णय घेईन.” असंही ओमराजेंनी सांगितलं. ओमराजे नेमकी काय राजकीय भूमिका घेणार, याकडे आता समर्थकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा