• Wed. Sep 23rd, 2026
दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एकाच ठिकाणी


Marathi News Live: ‘बेस्ट’ची बससेवा ठप्प पडल्याने प्रवाशांना रिक्षा-टॅक्सी, ॲपआधारित सेवेचाच आधार घ्यावा लागला. तर, ‘बेस्ट’ उपक्रमाने संपकऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाईला सुरुवात केली असून, अनेक कामगारांना नोटीस बजावली आहे. ‘नीट’ची फेरपरीक्षा सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पूर्णत: सज्ज असल्याचे राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) शनिवारी जाहीर केले. आज, रविवारी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील रेंगाळलेले मान्सून आगमन २३ जूनपासून होऊ शकते, असे जाहीर केल्याने आता मंगळवारकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *