मुंबई
महामुंबईत दाखल होणाऱ्या वातानुकूलित लोकलच्या तिकिटांचे दर निश्चित करण्यासह या गाड्यांचा वेळापत्रकात समावेश आणि गर्दी व्यवस्थापनासाठी आयआयटी मुंबई सज्ज झाली आहे. मुंबई उपनगरी रेल्वेच्या आर्थिक शाश्वतेचा अभ्यास करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने या संस्थेची नियुक्ती केली आहे. आयआयटी मुंबईच्या वर्षभरात येणाऱ्या शिफारशी अहवालानंतर एसी लोकलबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
विशेषतः येत्या 10 वर्षांत प्रस्तावित एसी लोकल सेवांच्या विस्तारावर या अभ्यासात भर दिला जाणार आहे. यामुळे प्रवाशांच्या सेवेच्या दर्जात मोठी सुधारणा होणार असली, तरी त्यासोबतच भाडेरचना, सर्वसामान्य प्रवाशांची परवड, तांत्रिक अंमलबजावणी, टप्प्याटप्प्याने सेवा सुरू करण्याची प्रक्रिया, मध्य व पश्चिम रेल्वे मार्गांवरील वेळापत्रक आणि देखभाल व्यवस्था यांसारखी आव्हानेही अभ्यासात तपासली जाणार आहेत.
Mumbai Local Accident : मुंब्र्याजवळ लोकल अपघात, चालू ट्रेनमधून 13 जण पडले, 4 ठार
जनमत जाणून घेण्यावर भर
भविष्यातील पायाभूत सुविधा भागधारकांकडून सूचना आणि गुंतवणूक, वाहतूक नियोजन, अपेक्षा मागवण्यात येत असून, वेळापत्रक व्यवस्थापन आणि भविष्यात उपनगरी रेल्वेने प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा महामुंबईमधील वाहतुकीत कोणती याबाबत धोरणात्मक शिफारसी भूमिका बजावावी, याबाबत जनमत करण्यात येणार आहेत. या जाणून घेण्यावरही आयआयटी प्रकल्पासाठी प्रवाशांसह सर्व मुंबईचा भर आहे.दरम्यान, एसी लोकल ट्रेन सेवांचा आणखी विस्तार होणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. सोमवार, 26 जानेवारीपासून पश्चिम रेल्वे मार्गावर 12 अतिरिक्त एसी लोकल ट्रेन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. सोमवार ते शुक्रवार या काळात पश्चिम रेल्वेवर 109 एसी लोकल चालवल्या जातात. तर शनिवार आणि रविवारी 65 एसी लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर धावतात. आता हीच संख्या वाढवून सोमवार ते शुक्रवार 121 असेल, तर शनिवार-रविवारी 77 एसी लोकल धावतील.