जालना
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पारनेर येथे 24 जानेवारी 2026 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे, विधी संघर्ष ग्रस्त बालकाने मित्राच्या पोटात आणि छातीत चाकू भोसकून 22 वर्षीय तरुणाचा खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पवन संतोष बोराटे (वय 22 वर्ष) असे मयत तरुणाचे नाव आहे. यात जो खून करणारा विधी संघर्ष ग्रस्त बालक आहे. तो आणि मयत पवन हे मित्र होते मात्र काही दिवसापासून त्यांचे बिनसले होते.
काही घडण्याच्या आतच पवन हा स्वतःला सावरूही शकला नाही आणि रक्ताच्या थारोळ्यात जागीच पडला. यावेळी आसपासच्या नागरिकांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता, घटनास्थळावरून विधी संघर्ष ग्रस्त बालक हा फरार झाला आसपासच्या रहिवाशांनी सुद्धा पवनचा आरडाओरोड ऐकून घटनास्थळाकडे धाव घेतली आणि त्याला तात्काळ अंबड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र पवनची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी त्याला प्रथम उपचार करत पुढील उपचारासाठी जालना शहरातील घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले घाटी रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी पवनला तपासले असता त्यांनी पवनला मृत घोषित केले.
आपल्या कमावत्या मुलाचा मृत्यू झाल्याचे पवन च्या घरच्यांना कळतात त्यांनी एकच पाहू फोडत संबंधित विधी संघर्ष ग्रस्त बालकावर गुन्हा दाखल करत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच यामध्ये तो विधी संघर्ष ग्रस्त बालक हा एकटाच नसून त्याला इतरही चार-पाच साथीदार या प्रकरणात मदत करण्यासाठी होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी मयताचे मामा अतिश राहडगावकर यांनी केली असून पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता योग्य ती चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा.
या प्रकरणी मयताचे वडील संतोष बोराटे (वय 45 वर्ष) यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात विधी संघर्ष ग्रस्त बालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. तसेच आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे.