वडिलांचे तिकीट नाकारल्याचा राग मनात धरत तरुणाने आमदाराच्या कार्यालयासमोर लघूशंका केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. काही तासांनी त्याने तो व्हिडीओ डिलीट देखील केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर : महाराष्ट्रातील एकूण 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणूक पार पडत आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यात 59 जागांसाठी निवडणूक होते आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक इच्छुक उमेदवारांना डावलण्यात आले आहे. यामुळे इच्छुकांचा वेगवेगळ्या स्वरूपात निषेध नोंदवणे सुरू आहे. असाच एक धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे घडला आहे. आपल्या वडिलाला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तिकीट न दिल्याचा राग मनात धरत तरुणाने आमदार संजय बनसोडे यांच्या कार्यालयासमोर मूत्रविसर्जन करत निषेध नोंदवला आहे. मागील बऱ्याच दिवसापासून संजय बनसोडे यांच्याकडे तरुणाच्या वडिलांनी उमेदवारीसाठी अर्ज केला होता. आयत्यावेळी त्यांची उमेदवारी नाकारल्यामुळे यांचे चिरंजीवाने काल सायंकाळी उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांच्या कार्यालयासमोर जाऊन घोषणा देत मूत्रविसर्जन केले आणि तो व्हिडिओ सोशल माध्यमांवर अपलोड केला. यानंतर काही तासातच तो व्हिडिओ त्याने डिलीट केला. या घटनेची चर्चा जिल्हाभर होते आहे.
भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती
लातूर शहर महानगरपालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा हे आमनेसामने लढले. यामुळे लातूर महापालिकेमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. झालेली चूक लक्षात घेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकमध्ये शक्य तिथे युती करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून करण्यात आला आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघातील एकूण 10 जागांसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती जाहीर करण्यात आली. यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना संधी मिळू शकली नाही. 5 जागांवरती भाजप तर 5 जागांवर राष्ट्रवादी अशी युती जाहीर करण्यात आली आहे. यामुळे दोन्ही पक्षांचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
आमदार संजय बनसोडे काय म्हणाले?
“उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची युती झाल्याकारणामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून तिकीट मागणाऱ्यांची संख्या लक्षात घेता सर्वांना तिकीट देता येत नाही”, अशी प्रतिक्रिया आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे. “कार्यकर्त्यांचा पक्षावर असलेल्या राग आम्हाला मान्य आहे. मात्र अशा स्वरूपाचे चुकीचे कृत्य करू नका”, असे आवाहन आमदार संजय बनसोडे यांनी केले आहे. “ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. पण कार्यकर्त्यांना प्रत्येकाला संधी देणे पक्षाला शक्य नसते. कोणत्या वेळी कोणत्या कार्यकर्त्याला संधी मिळते तर कोणत्या कार्यकर्त्याला मिळत नाही. यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता काम करत राहावे. कामाचे फळ नक्कीच मिळते”, अशा शब्दांत त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा