ठाणे महापालिका निवडणुकीनंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली घडल्या. ठाणे महापालिकेच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्यांची निवड करण्यात आली.
शिवसेना नगरसेवकांच्या गटनेता निवडीच्या बैठकीत शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे नगरसेवक पवन कदम यांची ठाणे महानगरपालिकेच्या गटनेते पदी निवड करण्यात आली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रविंद्र फाटक, ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक व पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांची बैठक ठाण्यात पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांची ठाणे महानगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, नगरसेवक सुहास देसाई, राजन किणे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
KDMC Election : उद्धव ठाकरेंसोबत निष्ठावंत राहिलेल्या 7 नगरसेवकांची यादी, वाचा A टू Z
शिवसेनेचे धक्कातंत्र
शिवसेनेमधील विविध कार्यक्रम आणि निर्णयाचे केंद्र असलेल्या टेंभीनाका परिसरातून पवन कदम पालिकेवर यंदा निवडून आले आहेत. याआधी पालिकेत स्विकृत नगरसेवक म्हणून कदम यांनी एंट्री घेतली होती. मागील टर्ममध्ये त्यांच्या पत्नी पल्लवी कदम या निवडणुकीत विजयी ठरल्या होत्या. त्यांची उपमहापौरपदी वर्णी लागली होती. शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नगरसेवकांची नावे या पदासाठी चर्चेत असताना कदम यांना ही संधी देत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विश्वासू असलेल्यांना संधी देण्याची खेळी या निमित्ताने करण्यात आली आहे.
KDMC Election : ‘कल्याण डोंबिवलीतील घडामोडींवरुन राज ठाकरे खूप व्यथित’, संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट
अनुभवी मुल्ला यांना संधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांनी याआधीही पालिकेचे गटनेतेपद भूषवले आहे. त्यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावताना सत्ताधाऱ्यांना अंगावर घेतले आहे. पालिका प्रशासनावर वचक आणि अभ्यासू नगरसेवक अशी मुल्ला यांची ओळख असल्याने पक्षातील फुटीनंतर देखील त्यांनाच या पदी कायम ठेवण्यात आले.
