कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर तिथल्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होताना दिसत आहे. मनसेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 11 पैकी केवळ 7 जणांचा गट स्थापन झाला आहे. या सातही नगरसेवकांची यादी आम्ही तुम्हाला देणार आहोत.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 11 तर मनसेला 5 जागांवर यश मिळालं. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट हे महापौर पदासाठी जायंट किलर ठरताना दिसले. भाजप आणि शिवसेना यांच्यात असलेल्या महापौर पदाच्या रस्सीखेचमुळे फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला. ठाकरे गटाचे दोन नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल आहेत. तर दोन नगरसेवकांनी गटस्थापनेला गैरहजेरी लावली. तरिही ठाकरेंच्या पाठिमागे खंबीरपणे साथ देणारे ते 7 नगरसेवक कोण आहेत? याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण शहरप्रमुळ बाळा परब यांनी काल पत्रकार परिषद घेत गट स्थापनेबाबत माहिती दिली होती. ठाकरे गटाच्या 7 नगरसेवकांचा गट स्थापन झाल्याची माहिती त्यांनी दिली. गट स्थापनेच्या बैठकीला दोन नगरसेवकांना माहिती देवूनही ते आले नाहीत. राहुल कोट आणि स्वप्नाली केणे या दोन नगरसेवकांशी संपर्क होऊनही ते बैठकीला आले नाहीत. तर मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. हे चार नगरसेवक वगळता 7 नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला आहे. उमेश बोरगावकर यांची गटनेता पदी नियुक्ती करण्यात आली. तर संकेश भोईर यांची प्रतोद पदी निवड करण्यात आल्याची माहिती बाळा परब यांनी दिली. हे चार नगरसेवक वगळता ठाकरेंना साथ देणाऱ्या 7 नगरसेवकांची यादी जाणून घेऊयात.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या 7 नगरसेवकांची प्रभागनिहाय यादी :
प्रभाग क्रमांक 4 अ (आरक्षण – अनुसूचित जाती महिला) – तेजश्री गायकवाड
प्रभाग क्रमांक 6 अ (आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग) – उमेश बोरगावकर – गटनेता पदी निवड
प्रभाग क्रमांक 6 ब (आरक्षण – सर्वसाधारण महिला) – अपर्णा भोईर
प्रभाग क्रमांक 6 ड (सर्वसाधारण) – संकेश भोईर – प्रतोद पदी निवड
प्रभाग क्रमांक 10 ब (आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग) – विशाल गारवे
प्रभाग क्रमांक 15 अ (आरक्षण – अनुसूचित जाती महिला) – वंदना माहिले
प्रभाग क्रमांक 16 अ (आरक्षण – अनुसूचित जाती) – नीलेश खंबायत
